Newsclick Case: न्यूजक्लिक प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, प्रबीर पुरकायस्थ अन् अमित चक्रवर्ती यांना अटक

Newsclick Case: दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ऑनलाइन न्यूज पोर्टल 'न्यूजक्लिक' आणि त्याच्या पत्रकारांशी संबंधित 30 ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती दिली.
 Prabir Purkayastha
Prabir PurkayasthaDainik Gomantak
Published on
Updated on

Newsclick Case: दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ऑनलाइन न्यूज पोर्टल 'न्यूजक्लिक' आणि त्याच्या पत्रकारांशी संबंधित 30 ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती दिली.

त्यानुसार, यूएपीए प्रकरणाच्या संदर्भात आज घेण्यात आलेल्या झडती, जप्ती आणि कोठडीसंबंधी आता प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, एकूण 37 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे, तर 9 महिला संशयितांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली आहे. तसेच, तपासासाठी डिजिटल उपकरणे, कागदपत्रे इत्यादी जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. पोर्टलला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.

दिल्लीशिवाय (Delhi) नोएडा आणि गाझियाबादमध्येही पोलिस 30 हून अधिक ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 2021 मध्ये, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा न्यूजक्लिकला मिळालेल्या बेकायदेशीर निधीबद्दल गुन्हा दाखल केला होता.

न्यूज क्लिकला हा संशयास्पद निधी चीनी कंपन्यांच्या माध्यमातून मिळाला. यानंतर ईडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. मात्र, त्यावेळी हायकोर्टाने न्यूजक्लिकच्या प्रवर्तकांना अटकेपासून दिलासा दिला होता.

 Prabir Purkayastha
'जुने न्यायाधीश उदार होते, आम्ही नाही...'; SC चे न्यायाधीश निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याला असं का बोलले?

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'न्यूजक्लिकशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.' मात्र, ईडीकडून सुरु असलेल्या तपासात ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले नाही.

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने एक नवीन गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लॅपटॉप जप्त

एका मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावेही जप्त केले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कचाही समावेश आहे. स्पेशल सेलसोबतच दिल्ली पोलिसांच्या काही स्थानिक युनिट्सही छापे टाकत आहेत.

 Prabir Purkayastha
LAC वर बॉर्डर इंटेलिजन्स पोस्टला मंजूरी, ट्रेंड ऑफिसर चिनी सैन्याच्या हालचालींवर ठेवणार लक्ष्य!

चीन कनेक्शन

काही दिवसांपूर्वी अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला होता की, न्यूज क्लिक या जागतिक नेटवर्कचा भाग आहे, ज्याला अमेरिकन अब्जाधीश नेव्हिल रॉय सिंघमकडून निधी मिळतो.

विशेष म्हणजे, सिंघम कथितरित्या चिनी मीडियासोबत जवळून काम करतो. ईडीने सप्टेंबर 2021 मध्ये पुरकायस्थ यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com