Mukhtar Ansari: माफिया मुख्तार अन्सारीला न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड!

Mukhtar Ansari: बांदा कारागृहात बंद माफिया मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) याला एमपी/एमएलए न्यायालयाने गँगस्टर कायद्यातर्गंत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Mukhtar Ansari
Mukhtar AnsariDainik Gomantak
Published on
Updated on

Afzal Ansari-Mukhtar Ansari: बांदा कारागृहात बंद माफिया मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) याला एमपी/एमएलए न्यायालयाने गँगस्टर कायद्यातर्गंत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुख्तार अन्सारीने बांदा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावली होती.

दरम्यान, 23 सप्टेंबर 2022 रोजी न्यायालयात खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर प्रथमदर्शनी आरोप निश्चित करण्यात आले. निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस (Police) आणि प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.

Mukhtar Ansari
Atiq Ahmed Murder Case: अतिकच्या हत्येपूर्वी शूटर्संनी पाहिला होता मुसेवालाच्या हत्येचा व्हिडिओ, 16 सेकंदात...

तसेच, न्यायालयाने निर्णयासाठी 15 एप्रिलची तारीख दिली होती, मात्र पीठासीन अधिकारी रजेवर असल्याने निर्णय होऊ शकला नाही.

29 एप्रिल, शनिवार म्हणजेच आज निकालाची तारीख निश्चित करण्यात आली. गॅंगस्टर प्रकरणात दोन वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे.

गँगस्टर प्रकरणात अफजल अन्सारीला शिक्षा झाल्यास त्यांची खासदारकी रद्द होईल. कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदार किंवा खासदाराचे सदस्यत्व संपते. राहुल गांधी हे या प्रकरणातील सर्वात मोठे उदाहरण आहे.

संपूर्ण प्रकरण काय होते ज्यावर निर्णय येणार आहे

22 नोव्हेंबर 2005 रोजी मुहम्मदाबाद पोलिसांनी खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, त्यात भंवरकोल येथील कृष्णा नंद राय खून प्रकरण आणि गॅंग चार्टमध्ये वाराणसीतील नंद किशोर रुंगटा यांचा समावेश आहे. तेव्हापासून गाझीपूरचे खासदार अफजल अन्सारी जामिनावर बाहेर आहेत.

Mukhtar Ansari
Atiq Ahmed: 'रुम नंबर 203 मध्ये रचला होता अतिक-अश्रफच्या हत्येचा प्लान...', SIT ला मिळाले दोन मोबाईल!

आमदारकी गमावल्यानंतर राय यांची हत्या झाली होती

29 नोव्हेंबर 2005 रोजी गाझीपूरमध्ये मोहम्मदाबादमधील भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांच्यासह एकूण 7 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

निवडणुकीच्या (Election) वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली. या खून प्रकरणात मुख्तार अन्सारी आणि अफजल यांना आरोपी बनवण्यात आले होते. खरे तर, 2002 मध्ये अन्सारी बंधूंचे वर्चस्व असलेल्या मोहम्मदाबाद विधानसभेच्या जागेवर कृष्णानंद राय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com