Atiq Ahmed: 'रुम नंबर 203 मध्ये रचला होता अतिक-अश्रफच्या हत्येचा प्लान...', SIT ला मिळाले दोन मोबाईल!

Atiq Ahmed: एसआयटीने 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान हॉटेलमध्ये आलेल्यांची यादी, ओळखपत्र आणि एंट्री बुक ताब्यात घेतले आहे.
Atiq Ahmed
Atiq AhmedDainik Gomantak
Published on
Updated on

Atiq Ahmed-Ashraf Murder Case: माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येचा तपास करत असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) शनिवारी तिन्ही हल्लेखोर ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे पोहोचले.

एसआयटीने रुम नंबर 203 मधून दोन मोबाईल जप्त केले आहेत. पण त्यात सिम नव्हते. एसआयटीने 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान हॉटेलमध्ये आलेल्यांची यादी, ओळखपत्र आणि एंट्री बुक ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, अनेक लोकांचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाइल आणि इतर पुरावे तपासात एसआयटीला मदत करतील, अशी शक्यता आहे. कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.

Atiq Ahmed
Atiq Ahmed Murder Case: अतिक-अश्रफचे दहशतवादी कनेक्शन? दहशतवाद्यांनी मारेकऱ्यांना...

हल्लेखोर अतिक-अश्रफ यांची ई-रिक्षाने रेकी करायचे

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवलेश तिवारी, सुमित उर्फ ​​सनी सिंग आणि अरुण मौर्य या शूटर्संनी आत्मसमर्पण केल्यानंतर चौकशीदरम्यान सांगितले होते की, त्यांनी बस स्टँड आणि स्टेशनवर रात्र काढली होती.

मात्र, त्यांना रिमांडवर घेऊन त्यांची कडक चौकशी केली असता त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांनी रेल्वे स्टेशन ते खुलदाबाद पोलिस (Police) स्टेशन दरम्यान असलेल्या हॉटेल स्टे इनमध्ये एक रुम घेतली होती.

हत्येपूर्वी त्यांनी मोबाइलमधून संबंधित सिम फेकून दिले होते. विशेष म्हणजे, एका व्यक्तीकडे बाईकही मागितली होती, मात्र ती न मिळाल्याने त्यांनी अतिक-अश्रफ यांची ई-रिक्षाने रेकी केली.

13 एप्रिल रोजी हल्लेखोरांनी रुम घेतली होती

प्रयागराज हॉटेलचे कर्मचारी मोहित श्रीवास्तव यांनी सांगितले की, तीन हल्लेखोर रुम क्रमांक 203 मध्ये थांबले होते. ज्यावेळी पोलिस छापा मारण्यासाठी आले तेव्हा त्यांना जे काही मिळाले ते सोबत घेऊन गेले. 13 एप्रिल रोजी हल्लेखोर हॉटेलमध्ये (Hotel) राहण्यासाठी आले होते.

Atiq Ahmed
Atiq Ahmed Death Case: अतिक-अश्रफला 'शहीद' संबोधणारे झळकले बॅनर, पोलिसांनी केली मोठी कारवाई

15 एप्रिल रोजी तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या

उमेश पाल हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले अतिक आणि अश्रफ यांची गेल्या शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

ही घटना घडली तेव्हा त्यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेले जात होते. मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून अरुण मौर्य, लवलेश तिवारी आणि सनी अशी त्यांची नावे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com