Atiq Ahmed Murder Case: अतिकच्या हत्येपूर्वी शूटर्संनी पाहिला होता मुसेवालाच्या हत्येचा व्हिडिओ, 16 सेकंदात...

Atiq Ahmed Murder Case: माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Atiq Ahmed
Atiq AhmedDainik Gomantak
Published on
Updated on

Atiq Ahmed Murder Case: माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मारण्यासाठी फक्त 16 सेकंद लागले आणि 34 गोळ्या झाडल्या.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सांगितले की, त्यादरम्यान त्यांनी अतिक-अश्रफ यांच्या पिस्तूलची तपासणी केली ज्यातून हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.

मुसेवालाच्या हत्येचा व्हिडिओ शूटर्सनी पाहिला होता

एसआयटीला आणखी एक खळबळजनक माहिती मिळाली आहे. आरोपींच्या (Accused) चौकशीत असे समोर आले की, अतिकच्या हत्येपूर्वी लोबलेश, अरुण आणि सनी यांनी पंजाब काँग्रेसचे नेते आणि गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा व्हिडिओ अनेकदा पाहिला होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओवरुनच त्यांना ही घटना घडवण्याची कल्पना सुचली. यानंतर त्यांनी मुसेवालाप्रमाणे अतिक आणि अश्रफ यांना ठार मारण्याचा कट रचला.

तसेच, मुसेवालाची गेल्या वर्षी 29 मे रोजी पंजाबमधील (Punjab) मानसा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

याच प्रकारे यावर्षी 15 एप्रिल रोजी प्रयागराज हॉस्पिटलसमोर अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

शूटर पत्रकाराच्या वेशात आले होते

पत्रकारांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार केला. अटक केलेल्यांपैकी सनी सिंग याने सांगितले की, दिल्लीतील गँगस्टर जितेंद्र गोगीकडून पत्रकार म्हणून हल्ल्याची योजना त्याला मिळाली होती. गोगीने अतिक आणि अश्रफ यांना मारण्यासाठी पत्रकाराच्या वेशात जाण्याचा सल्ला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com