या वर्षाच्या अखेरीस सर्व पात्र नागरिकांचे होणार लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्री (Union Health Minister) पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियाना वर चर्चा करतील.
कोविड लस
कोविड लसDainik Gomantak

भारत सरकारने (Government of India) या वर्षाच्या अखेरीस सर्व पात्र लोकसंख्येचे लसीकरण (Vaccination) करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 76 टक्के प्रौढ लोकांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. देशात आतापर्यंत एकूण 1.02 अब्ज लसीचे डोस देण्यात आले आहेत.

देशातील कोविड-19 (Covid 19 ) लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आठवडाभरापूर्वी भारताने 100 कोटी कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडला असताना आरोग्य मंत्र्यांसोबतची ही बैठक होणार आहे. मांडविया या बैठकीत कोविड लसीचा दुसरा डोस लागू करण्यात होणाऱ्या विलंबावरही चर्चा करतील.

कोविड लस
"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास " याचं जिवंत उदाहरण म्हणजे लसीकरण: पंतप्रधान

21 ऑक्टोबर रोजी, देशातील लसीकरणाची संख्या 1 अब्ज ओलांडल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की आता दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी लस सुनिश्चित केली जाईल. एका निवेदनात केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अशा लाभार्थ्यांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सीनचे 11 कोटीहून अधिक डोस अजूनही देशात शिल्लक आहेत, परंतु 10 कोटी पात्र लोक दुसऱ्या डोसची वाट पाहत आहेत.

कोविड लसीचा पहिला डोस भारतातील 76 टक्के प्रौढ लोकांना देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 1,02,94,01,119 लसीचे डोस लागू करण्यात आले आहेत. त्यापैकी 71.91 कोटी लोकांना पहिला डोस आणि 31.02 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. दोन्ही डोस घेणारी लोकसंख्या 32 टक्के आहे.

कोविड लस
गोव्यात नागरिकांचे 72% लसीकरण पूर्ण: मुख्यमंत्री

PM आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनवरही चर्चा:

मांडविया बुधवारी 'पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियाना' वर आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करू शकतात. मंडवीय यांनी मंगळवारी सांगितले की, या अंतर्गत सर्व आरोग्य सुविधा असलेले दोन कंटेनर उभारले जातील, जे आपत्कालीन (Emergency) परिस्थितीत कोणत्याही ठिकाणी नेले जाऊ शकतात. प्रत्येक कंटेनरमध्ये 200 खाटांची क्षमता असून ते दिल्ली आणि चेन्नईमध्ये (Delhi and Chennai) बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हे कंटेनर आपत्कालीन परिस्थितीत हवाई किंवा रेल्वेने नेले जाऊ शकतात.

भारत सरकारने या वर्षाच्या अखेरीस सर्व पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी राज्यांवर भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी कोविड-19 लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा बायोफार्मा आणि पॅनेसिया बायोटेक यांचे प्रतिनिधी पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com