बंगळुरुमध्ये 'सनम बेवफा', लिव्ह-इन पार्टनरचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर टाकायचा; पोलिसांनी...

Karnataka Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Arrest
ArrestDainik Gomantak

Karnataka Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, एका 26 वर्षीय व्यक्तीला बंगळुरु पोलिसांनी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचे प्रायव्हेट फोटो मॉर्फ करुन वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्याबद्दल अटक केली आहे.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी बुधवारी सांगितले की, संजय कुमार आणि त्याची 24 वर्षीय गर्लफ्रेंड लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांनी पुढे सांगितले की, ते दोघेही लग्न करण्याचा विचार करत होते.

त्याने गर्लफ्रेंडचे फोटो का पोस्ट केले?

पोलिसांनी सांगितले की, दोघेही वेल्लोर, तामिळनाडूचे रहिवासी असून ते दहावीपासून एकमेकांना ओळखतात. त्यांनी पुढे सांगितले की, गर्लफ्रेंडचे अपलोड केलेल्या फोटोंवरील कमेंट वाचून आरोपीला 'आनंद' वाटला.

संबंधित पीडितेने संजय कुमारसोबत पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्यात तिने आरोप केला होता की कोणीतरी तिचे प्रायव्हेट फोटो टेलिग्राम आणि इंस्टाग्राम (Instagram) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले आहेत.

Arrest
Karnataka Crime: क्रूरता ! लेकानचं केली बापाची हत्या, मृतदेहाचे 32 तुकडे करुन...

‘तक्रारीनंतर तात्काळ कारवाई’

पीडितेच्या तक्रारीनंतर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर तपासकर्त्यांनी फोटो हटवण्यासाठी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला आणि ज्या व्यक्तीच्या अकाऊंटवरुन फोटो ऑनलाइन अपलोड करण्यात आले त्या व्यक्तीची माहितीही मागवली.

पोलीस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरने हे फोटो पोस्ट केल्याचे समोर आले आहे.

Arrest
Karnataka Crime: मुस्लिम तरुणाने हिंदू अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, 'इस्लाम स्वीकार नाहीतर...'

'आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली'

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याचे मित्र आणि नातेवाईकांचे फोटो मॉर्फ केले आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com