Karnataka Crime News: कर्नाटकात दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणासारखे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकातील बागलकोटमध्ये एका व्यक्तीने वडिलांची हत्या करुन मृतदेहाचे 32 तुकडे केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मृतदेहाचे तुकडे बोअरवेलमध्ये फेकून दिले. हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी मृताच्या मृतदेहाचे तुकडे जप्त केले. आरोपी विठ्ठल कुलाली याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर रोजी 20 वर्षीय विठ्ठलने रागाच्या भरात वडील परशुराम कुलाली (53) यांची लोखंडी रॉडने हत्या केली. दारुच्या नशेत परशुराम आपल्या दोन मुलांपैकी लहान असलेल्या विठ्ठलल अनेकदा शिवीगाळ करत असे. परशुराम यांची पत्नी आणि मोठा मुलगा वेगळे राहतात.
लोखंडी रॉडने खून
गेल्या मंगळवारीही विठ्ठलच्या वडिलांनी शिवीगाळ सुरु केली. यामुळे संतापलेल्या विठ्ठलने लोखंडी रॉडने वडिलांची हत्या केली. हत्येनंतर आरोपी (Accused) विठ्ठलने परशुराम यांच्या मृतदेहाचे 32 तुकडे केले. त्यानंतर त्याने हे तुकडे शेतातील बोअरवेलमध्ये टाकले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.