मुस्लीम पुरुषांना चार लग्नांचा अधिकार असेल तर सर्व पत्नींना समान वागणूक गरजेची...HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Madras High Court Islamic Law Polygamy: इस्लामिक कायद्यानुसार मुस्लिम पुरुषाला चार वेळा लग्न करण्याची परवानगी आहे, परंतु सर्व पत्नींना समान वागणूक देणे आवश्यक आहे.
High Court
High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Madras High Court Islamic Law Polygamy: एका मुस्लिम महिलेने तिच्या पतीवर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर तिरुनेलवेली फॅमिली कोर्टाने वैवाहिक संबंध तोडण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात पतीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने म्हटले की, इस्लामिक कायद्यानुसार मुस्लिम पुरुषाला चार वेळा लग्न करण्याची परवानगी आहे, परंतु सर्व पत्नींना समान वागणूक देणे आवश्यक आहे. या प्रकरणात पहिल्या पत्नीला पती आणि सासूने दिलेली वागणूक क्रूरतापूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

न्यायमूर्ती आरएमटी टीका रमन आणि पीबी बालाजी यांच्या खंडपीठाने सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीला पतीकडून समान वागणूक दिली गेली नाही. पहिल्या पत्नीला क्रौर्याला सामोरे जावे लागले. पती दोन वर्षे पत्नीची देखभाल करण्यात आणि तीन वर्षांपासून वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरला.

High Court
Madras High Court: 'न्यायालयांमध्ये महात्मा गांधी आणि तमिळ संत-कवी तिरुवल्लुवर यांचेच फोटो...', मद्रास HC चा आदेश

नवजात बालकाच्या मृत्यूनंतर अत्याचार सुरु झाले

पहिल्या पत्नीने आरोप केला होता की, नवजात मुलाच्या मृत्यूनंतर पती आणि सासू-सासऱ्यांचे वागणे तिच्याबाबत खूप कठोर झाले होते. शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचेही महिलेने सांगितले होते. यानंतर पतीने दुसरे लग्न केले. दुसरीकडे, महिलेच्या पतीने हे आरोप फेटाळून लावले. तो म्हणाला की, पहिल्या पत्नीला केवळ दुसरे लग्न करुन घटस्फोट देता येणार नाही. पतीने मेन्टेनन्सचे पैसे देत असल्याचे सांगत तडजोड करण्याचा प्रयत्नही केला पण पत्नीने ते स्वीकारण्यास नकार दिला.

High Court
Madras High Court |"सोशल मीडियावरील मॅसेज, बाणासारखा"; आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या माजी आमदाराला कोर्टाचा झटका

महिलांनाही वेगळे राहण्याचा अधिकार आहे

मुस्लिम महिलेला सासरच्या ठिकाणी चांगले वातावरण मिळत नसेल तर तिला वेगळे राहण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणीही उच्च न्यायालयाने केली. यासोबतच, खंडपीठाने फॅमिली कोर्टाचा निर्णय योग्य ठरवला आणि खटला पाहता या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असेही सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa murder case conditional bail after 4 years
Goa Children’s Act 2003 violation
Bombay High Court Goa Bench Panchayat Documents Order
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com