जर सासू-सासऱ्यांशी संबंध नसेल तर सुनेने घर सोडावे; कोर्टाने असा का दिला आदेश?

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्हा कौटुंबिक न्यायालयाने निकाल देताना घटस्फोटित सुनेला सासरचे घर सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्हा कौटुंबिक न्यायालयाने निकाल देताना घटस्फोटित सुनेला सासरचे घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, न्यायालयाने आपला आक्षेपही नोंदवला. सुनेला सासरच्या लोकांची काळजी घेण्यात रस नसेल, तर तिने ताबडतोब घर सोडावे, असे न्यायालयाने म्हटले. खरं तर, इंदूरचे रहिवासी असलेले 80 वर्षीय प्राध्यापक महादेव प्रसाद यादव यांनी आपल्या मुलापासून घटस्फोट घेतलेल्या प्राध्यापक सुनेविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला होता.

दरम्यान, प्रोफेसर यादव यांचे विजय नगर स्कीम 78 मध्ये दोन मजली घर आहे. येथे यादव पत्नीसह वरच्या मजल्यावर राहतात. खालच्या मजल्यावर त्यांची सून राहते, जिचा गेल्या वर्षी प्राध्यापक यादव यांच्या मुलापासून घटस्फोट झाला होता. पण सून घर सोडायला तयार नव्हती. तिने देखभालीसाठी दावाही दाखल केला होता. त्याचवेळी, सुनेचे सासू, सासरे यांच्यासोबतचे वागणेही अत्यंत वाईट होते. त्यामुळे हताश होऊन सासरे प्राध्यापक यादव यांनी न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता. सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितले की, सुनेचा वयोवृद्ध सासऱ्यांशी काहीही संबंध नाही. ती त्यांची पर्वाही करत नाही. त्यामुळे तिने घर सोडावे.

Court
Madhya Pradesh High Court: 'संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 16 वर्षे असावे...' मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची केंद्राला शिफारस

सुनेने पतीवर लादलेल्या भरणपोषणाच्या प्रकरणात न्यायालयाने म्हटले की, सून चांगली नोकरी करत असली तरी तिने स्वत:ची राहण्याची व्यवस्था करावी. याबाबत अधिवक्ता अमरसिंह राठोड यांनी सांगितले की, प्राध्यापक सुनेचे वेतन दरमहा दीड लाख रुपयांहून अधिक आहे. तिने पतीकडे देखभालीची मागणीही केली होती. जी मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती.

Court
Madhya Pradesh: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 11 जण ठार; सीएम यादव यांनी दिले चौकशीचे आदेश

दुसरीकडे, सुनेची वागणूक वाईट असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज स्वीकारला होता. न्यायालयाने प्रोफेसरच्या सुनेला सासरचे घर सोडण्यास सांगितले आहे आणि केस लढण्यासाठी सासरच्यांनी खर्च केलेले 60,000 रुपये परत करण्याचे आदेशही दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com