LTTE Leader Alive: 'प्रभाकरण अभी जिंदा हैं...', तमिळ नेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ

LTTE Leader Prabhakaran Alive: जागतिक तमिळ महासंघाचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी खळबळजनक दावा केला आहे.
LTTE Leader Prabhakaran Alive
LTTE Leader Prabhakaran AliveDainik Gomantak
Published on
Updated on

LTTE Leader Alive: लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) चे प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन याच्याबाबत जागतिक तमिळ महासंघाचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी खळबळजनक दावा केला आहे. प्रभाकरन जिवंत असून तो लवकरच परतणार असल्याचे पाझा यांनी सांगितले.

पाझा यांनी तंजावरमध्ये एक निवेदन जारी केले की, 'आमचा नेता प्रभाकरन जिवंत असून तो बरा आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. लवकरच योग्य वेळी तोही जगासमोर येणार आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'या बातमीमुळे लिट्टे प्रमुखाबाबत पसरवल्या जात असलेल्या अफवा उघड होतील.' जगभरातील तमिळ लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करताना पाझा म्हणाले की, 'एलटीटीई प्रमुख लवकरच तामिळ समुदायाच्या मुक्तीसाठी एक विशेष योजना आणणार आहे.'

LTTE Leader Prabhakaran Alive
Delhi Violence: जामिया हिंसाचार प्रकरणापासून 'या' न्यायमूर्तींनी घेतली फारकत, शरजील इमामसह 11 जणांची...

दरम्यान, प्रभाकरनबाबत श्रीलंकेच्या लष्कराने म्हटले होते की, '2009 मध्ये लष्करी कारवाईत त्याचा मृत्यू झाला होता. प्रभाकरनचा खात्मा केल्‍याच्‍या घोषणेनंतर श्रीलंकेचा (Sri Lanka) जाफना प्रदेश दहशतवादमुक्त झाला होता.'

दुसरीकडे, आपल्या नेत्याच्या मृत्यूची घोषणा ऐकून, LTTE गटाचे सदस्य पराभवाने मागे सरकले होते. पाझा म्हणाले की, 'राष्ट्रीय तामिळ नेते प्रभाकरन अजूनही जिवंत असल्याची मी खात्री देतो.' प्रभाकरनच्या कुटुंबीयांची संमती घेतल्यानंतरच आपण ही माहिती लोकांना (People) देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

LTTE Leader Prabhakaran Alive
Delhi Jahangirpuri Violence: गोळीबार करताना अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल

तसेच, पाझा यांनी आपल्या समाजातील लोकांना आवाहन करत प्रत्येकाने प्रभाकरनच्या पाठीशी उभे राहण्याची तयारी ठेवावी, असे सांगितले. यावेळी, त्यांनी राज्य सरकार आणि इतर पक्षांनाही असे आवाहन केले. एलटीटीई प्रमुखाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. तो पूर्ण बरा झाल्याची बातमी कळताच आणि घरच्यांची संमती मिळाल्यावर त्यांनी सार्वजनिकरित्या यासंबंधी माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com