Loksabha Election 2024 Result Update: राम मंदिराच्या मतदारसंघात भाजपची पिछाडी; समाजवादीचा उमेदवार आघाडीवर

Loksabha Election 2024 Result Update: यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास ठरली. याची प्रचिती आज निकालातून येत आहे.
Loksabha Election 2024 Result Awadhesh Prasad, the BJP candidate from Faizabad in Uttar Pradesh has left behind the BJP candidate
Loksabha Election 2024 Result Awadhesh Prasad, the BJP candidate from Faizabad in Uttar Pradesh has left behind the BJP candidateDainik Gomantak

Loksabha Election 2024 Result Update: यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास ठरली. याची प्रचिती आज निकालातून येत आहे. एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सत्ता मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. संपूर्ण निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस यांच्या निकराची लढाई पाहायला मिळाली. महाराष्ट्र उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिरम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसेल असे सांगण्यात आले होते. ज्याची प्रचिती सध्या निकालामधून येत आहे. खुद्द पंतप्रधान वाराणसी मतदारसंघातून पहिल्या फेरीत पिछाडीवर पडले होते. मात्र दुसऱ्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली.

यातच आता, उत्तर प्रदेशातील फैजाबाद मतदारसंघात भाजप पिछाडीवर आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी 114810 मतांसह आघाडी घेतली आहे तर भाजपचे उमेदवार लल्लू सिंह 113168 मतांसह पिछाडीवर आहेत. 2014 पासून फैजाबादची जागा भाजप जिंकत आहे. अवधेश प्रसाद सध्या ट्रेंडमध्ये पुढे आहेत. तर बसपाने सच्चिदानंद पांडे यांना येथून उमेदवारी दिली होती, जे खूप मागे आहेत. फैजाबादच्या मतदारांनी राममंदिराच्या मुद्द्याला किती महत्त्व दिले हे काही वेळातच कळेल, असे ट्रेंड पाहता दिसत आहे. मात्र लल्लू सिंह ट्रेंडमध्ये मागे पडताना दिसत आहेत. दुसरीकडे, रामनगरी अयोध्येत कोण बाजी मारतो हे पाहावे लागेल.

Loksabha Election 2024 Result Awadhesh Prasad, the BJP candidate from Faizabad in Uttar Pradesh has left behind the BJP candidate
Loksabha Election 2024: ‘’स्मृती इराणींचा पराभव नक्की, निवडणुकीनंतर अमेठीहून गोव्यात पाठवणार’’; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

दरम्यान, फैजाबाद लोकसभा जागेसाठी 20 मे रोजी मतदान झाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत फैजाबादमधून भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांनी 65 हजारांहून अधिक मतांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार आनंद सेन यादव यांचा पराभव केला होता. तर काँग्रेसचे उमेदवार निर्मल खत्री तिसऱ्या स्थानी राहिले होते. लल्लू सिंह यांना 5 लाख 29 हजार 21 तर आनंद सेन यादव यांना 4 लाख 63 हजार 544 मते मिळाली होती. फैजाबादमध्ये आतापर्यंत काँग्रेसने 7 वेळा तर भाजपने 4 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय, सपा, बसपा आणि भारतीय लोकदलानेही येथून विजय मिळवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com