Kanjhawala Case: कंझावाला प्रकरणात 11 पोलिसांना केले निलंबित

Kanjhawala Case: मिळालेल्या माहितीनुसार, हे 11 पोलिस घटना घडली त्यादिवशी ड्युटीवर होते. यामध्ये सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि कॉन्सेबलचा समावेश आहे.
Kanjhawala case
Kanjhawala caseDainik Gomantak

Kanjhawala Case: दिल्लीत घडलेल्या कंझावाला प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. याआधी मृत अंजलीची मैत्रिण निधीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली असल्याचे समोर आले होते.

त्याचबरोबर, स्वत: अंजलीवर ट्रॅफिक नियम मोडत वेगात गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गृहमंत्रालयाने दिल्ली( Delhi ) पोलिसांना या प्रकरणाचा वेगाने तपास करण्याचे आदेश दिले होते. आता कंझावाला प्रकरणात 11 पोलिसांना निलंबित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे 11 पोलिस घटना घडली त्यादिवशी ड्युटीवर होते. यामध्ये सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि कॉन्सेबलचा समावेश आहे. कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याचा ठपका निलंबित झालेल्या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.

Kanjhawala case
Amit Shah in J-K: अमित शहांचे 'मिशन काश्मीर', दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी...

दरम्यान 31 डिसेंबरच्या रात्री मृत अंजली आणि निधी स्कूटीवरुन जात असताना वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या स्कूटीला धडक दिली. त्यामध्ये अंजली गाडीमध्ये अडकली. आरोपींनी गाडी न थांबवता अंजलीला 12 किलोमीटर फरफटत नेले. त्यातच अंजलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोपींनी अंजली गाडीखाली अडकल्याचे माहित असल्याचे कबूल केले होते . हत्येचा आरोप लागेल या भीतीने गाडी न थांबवल्याचे आरोपींनी म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत . गृहमंत्रालया( Home Ministry )ने यात लक्ष घातल्याने कंझावाला प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com