इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्लेऑफसाठी चार टीम निश्चित झाल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) प्लेऑफसाठी पात्र ठरलेला पहिला संघ होता, त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा त्यापाठोपाठ सनरायझर्स हैदराबाद (SRH) गुजरात टायटन्सला घराचा रस्ता दाखवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला स्पर्धेबाहेर काढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने शनिवारी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. आता सर्वांच्या नजरा प्लेऑफच्या सामन्यांकडे लागल्या आहेत.
प्लेऑफचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होईल.
तारीख: 21 मे | वेळ: 7:30 PM IST | स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
एलिमिनेटर (Eliminator)
गुणतालिकेत तिसरे आणि चौथे स्थान मिळवणारे संघ एलिमिनेटरमध्ये एकमेकांशी भिडतील. यात आरसीबीचा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील आरआरशी होणार आहे.
तारीख: 22 मे | वेळ: 7:30 PM IST | स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
क्वालिफायर 2 (Qualifier 2)
क्वालिफायर 1 हरलेल्या संघाला क्वालिफायर 2 द्वारे अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची आणखी एक संधी मिळते. क्वालिफायर 2 मध्ये KKR आणि SRH पैकी एकाचा सामना एलिमिनेटर (RCB किंवा RR) च्या विजेत्यांशी होईल. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत क्वालिफायर 1 च्या विजेत्याशी सामना करेल.
तारीख: 24 मे | वेळ: 7:30 PM IST | स्थळ: चेपॉक, चेन्नई
आयपीएल 2024 फायनल (IPL 2024 Final)
क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 मधील विजेते यांच्यात विजेतेपदाचा निर्णायक सामना होईल. प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या चार संघांपैकी फक्त आरसीबीने अद्याप विजेतेपद जिंकले नाही.
तारीख: 26 मे | वेळ: 7:30 PM IST | स्थळ: चेपॉक, चेन्नई
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.