India Bans Pakistan Channels
India Bans Pakistan ChannelsDainik Gomantak

India Bans Pakistan Channels: भारताचा पाकिस्तानवर 'डिजिटल स्ट्राईक', 16 पाकिस्तानी न्यूज चॅनेल्सवर बंदी, माजी क्रिकेटपटूंनाही फटका

India Ban 16 Pakistani Channel: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरूद्ध कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आहे.
Published on

दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरूद्ध कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्ससह काही प्रमुख न्यूज चॅनेल्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे.

डॉन न्यूज, समा टीव्ही, ARY न्यूज, जिओ न्यूज यांसारख्या पाकिस्तानी मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. या चॅनेल्सवर आरोप करण्यात आला आहे की, हे चॅनेल्स भारताविरुद्ध खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते. त्यामुळं भारत सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने एकामागोमाग कठोर निर्णय घेत पाकिस्तानला दणका दिला आहे. भारतातील काही पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, सिंधू नदीवरील पाणी वाटप कराराला भारतानं स्थगिती दिली आहे. 

माजी क्रिकेटर्सच्या युट्यूब चॅनेलवर बंदी

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या हिंदू नागरिकांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. केंद्र सरकारनेही तत्काळ निर्णय घेत पाकिस्तानविरोधातील अनेक पावले उचलली.

भारत सरकारनं पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनेल्सवर बंदी आणली आहे. या चॅनल्समध्ये माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांसारख्या मोठमोठ्या युट्यूब चॅनल्सचाही समावेश आहे.

अशातच आता, भारत सरकारने पाकिस्तानला मोठा दिला धक्का आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, भारताने पाकिस्तानातील १६ यूट्यूब चॅनेल्स आणि काही न्यूज चॅनेल्सवर बंदी घातली आहे. या यादीत डॉन न्यूज, समा टीव्ही, ARY न्यूज, जिओ न्यूज यांसारख्या चॅनेल्सचा समावेश आहे.

भारत सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडल देखील भारतातील वापरकर्त्यांसाठी ब्लॉक केलं आहे. आता भारतीय वापरकर्ते एक्स प्लॅटफॉर्मवरील पाकिस्तान सरकारचं अधिकृत सोशल मीडिया अकाउंट पाहू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com