India and China Conflict: भारत अन् चीनमधला हिंसक संघर्ष कधी थांबणार?

चीनच्या सैन्यांनी सहाव्यांदा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
India and China Conflict
India and China ConflictDainik Gomantak

भारत आणि चीनमधील वाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे. अलिकडेच झालेल्या अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे झालेल्या भारतीय चीनी सैनिकांमधील चकमकीमुळे वाद निर्माण झाला आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले की, चीनच्या सैन्यांनी 9 डिंसेबर रोजी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय जवानांनी त्यांना अडवले आणि त्याच्यात चकमक झाली.

या हिंसक चकमकीनंतर चीनने एक निवेदन जारी करून सीमेवरील परिस्थिती स्थिर असल्याचे म्हटले आहे. लडाखमधील गलवानमध्ये 30 महिन्यांपूर्वीही हिंसक संघर्ष झाला होता. 1962 मधील भारत-चीन युद्धविरामानंतर ही सहावी वेळ आहे. जेव्हा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे.

  • एलएसीवर हिंसक संघर्ष कधी झाला?

नाथू ला दर्रा (1967)

1962 च्या युद्धानंतर केवळ 5 वर्षांनी चीनने सिक्कीममधील नाथू ला दर्रावर हल्ला केला. त्यावेळी भारतीय सैनिक तारा लावून नाथू ला ते सेबू ला पर्यंतच्या सीमेचे मॅपिंग करत होते.

तुलुंग (1975)

अरुणाचलमधील आसाम रायफल्सचे सैनिक तुलुंगमध्ये गस्त घालत होते. दरम्यान, चीनने हल्ला केला. चीनच्या या कृत्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. पण या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद झाले.

रिपोर्टनुसार, चिनी सैनिकांनी तुलुंग जवळ एलएसीच्या 500 मीटर आत दगड पुरले होते, जे काढण्यासाठी आसाम रायफल्सचे जवान आले होते. त्याचवेळी चीनने (China) घात घालून गोळीबार केला. एलएसी सीमेवर गोळीबाराची ही शेवटची घटना होती.

तवांग (1987) -

चीनमध्ये या काळात ली जिनियांगची सत्ता होती. चीन विस्तारवादाच्या मार्गावर जाण्याच्या तयारीत होता. अशा परिस्थितीत अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली.

भारताने येथे आधीच सैनिक तैनात केले होते. तवांगच्या आसपास सुमारे 200 गोरखा रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले होते. संघर्षाची परिस्थिती पाहता भारताने MI-26 हेलिकॉप्टरही तैनात केले होते.

India and China Conflict
India China Standoff: चीनवरून राजकीय तणाव कायम; खर्गेंनी बोलावली विरोधी पक्षांची तातडीची बैठक

डोकलाम (2017)

डोकलामच्या पर्वतावर चीन, भारत (India) आणि भूतानची सीमा मिळते. 18 जून 2017 रोजी 300 भारतीय सैनिकांनी चीनला रस्ता बनवण्यापासून रोखले. त्यानंतर जवळपास 75 दिवस येथे तणावग्रस्त वातावरण राहिले.

यादरम्यान अनेकवेळा युद्धसदृश परिस्थितीही निर्माण झाली. पण भारतीय जवान सीमेवर ठाम राहिले. अखेरीस, करारानुसार, ऑगस्ट 2017 मध्ये, दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला.

गलवन (2020)

15 जून रोजी लडाखच्या गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. सुमारे 8 तास चाललेल्या या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले.

तवांग (2022)

9 डिसेंबरला तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये 6 भारतीय जवान जखमी झाले आहेत. हाँगकाँगच्या मीडिया रिपोर्टनुसार, या हिंसक चकमकीत 20 चिनी सैनिकही जखमी झाले आहेत.

  • चीनशी वाद होण्याचे ३ कारण

गलवान-पँगॉन्ग सरोवराच्या परिसरात दोन्ही देशांची सीमा निश्चित नाही. चीनला मॅकमोहन लाइन मान्य नाही.

भारत आणि चीनमध्ये 3448 किमी लांबीची जमीन सीमा आहे, तिचे सीमांकन केलेले नाही. गस्तीदरम्यान हाणामारी होते.

चीन अरुणाचलला तिबेटचा भाग मानतो, भारत अक्साई चीनला आपला भाग मानतो. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com