पत्नीच्या आइब्रो न आवडल्याने पठ्ठ्यानं दिला 'तलाक'; पीडितेने सांगितले, तो हुंडा मागायचा अन्...

Video Call Gave Triple Talaq From Saudi Arabia: भारतात तीन तलाकवर कायदा लागू होऊनही त्यासंबंधीची प्रकरणे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
Muslim Women
Muslim WomenDainik Gomantak
Published on
Updated on

Video Call Gave Triple Talaq From Saudi Arabia: देशात तीन तलाकवर कायदा लागू होऊनही त्यासंबंधीची प्रकरणे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तीन तलाक देत लग्न मोडण्याचा प्रकार अजूनही सुरु आहे.

कानपूरमध्ये असेच एक नवीन प्रकरण समोर आले असून, 2022 मध्ये झालेले लग्न एका तरुणाने तीन तलाक देत मोडले. दुसरीकडे, सासरच्यांच्या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या पीडितेने बादशाहिनाका पोलिस ठाण्यात तीन तलाक आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

लग्नादरम्यान 25 हजार रुपये हुंडा निश्चित करण्यात आला होता. 30 ऑगस्ट 2023 रोजी मोहम्मद सलीम सौदी अरेबियाला नोकरीसाठी निघून गेला.

यादरम्यान दोघांचे रोज फोनवरुन बोलणे व्हायचे. एकेदिवशी व्हिडिओ कॉलच्या वेळी त्याला पत्नीची आइब्रो पसंत न आल्याने फोनवर तिचे काहीही न ऐकून घेता तीन तलाक दिला.

हुंड्यासाठी छळ

महिलेने पोलिसांना (Police) सांगितले की, सासरच्यांनी तिच्या माहेरुन पैसे आणि सामान आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. हुंड्यामुळे ते खूश नसल्याने गाडीची मागणी करु लागले. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

छळाला कंटाळून ती प्रयागराजहून कानपूरला परतली. मात्र, पती सौदी अरेबियाहून परतल्यावर सर्व काही ठीक होईल, या विश्वासावर पीडितेने तिच्या सासरच्या लोकांचा छळ सहन केला.

Muslim Women
Triple Talaq: मुलगी झाली...', पतीने दिला फोनवरुन तिहेरी तलाक, उज्जैनमध्ये FIR दाखल

पीडितेने पोलिसांना सांगितले की, 4 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9 वाजता तिच्या पतीने IMO अॅपद्वारे तिला व्हिडिओ कॉल केला होता. तो बराच वेळ बोलत होता.

यादरम्यान त्याला अचानक राग आला आणि मनाई असतानाही तू आइब्रो कसे केले, असे म्हणत त्याने फोन कट केला. तेवढ्यात त्याचा व्हॉईस कॉल आला आणि म्हणाला की, मनाई असतानाही तू आइब्रो कसे केले, त्यामुळे तुला तलाक देऊन लग्नाच्या बंधनातून मुक्त करतो आणि कॉल डिस्कनेक्ट केला.

Muslim Women
Triple Talaq: तिहेरी तलाक पीडितेने हिंदू म्हणून घेतले सात फेरे, अन्...

अनेकवेळा संपर्क करुनही पीडिता आली नाही

घटस्फोटाची (Divorce) माहिती मिळताच पत्नीने पतीला समजवण्याचा प्रयत्न केला की, तिने आइब्रो केले नाही. पण पतीने ऐकले नाही आणि तिला घटस्फोट दिला. पीडितेने सीएम पोर्टलवरही तक्रार नोंदवली आहे.

इन्स्पेक्टर बादशाहिनाका सुभाष चंद्रा यांनी सांगितले की, लोहा मंडी चौकीच्या प्रभारीने पीडितेशी अनेक वेळा संपर्क साधला आणि एफआयआर नोंदवण्यास सांगितले पण ती आली नाही.

कलेक्टरगंजचे एसीपी निशंक शर्मा यांनी सांगितले की, याप्रकरणी त्यांच्यासमोर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार आल्यावर तात्काळ एफआयआर नोंदवून कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com