'मला ती स्पर्शही करु देत नाही...' पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

Kanpur Court: उत्तर प्रदेशातील कानपूर न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी एका व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली आहे.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Kanpur Court: उत्तर प्रदेशातील कानपूर न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी एका व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली आहे.

घटस्फोटाचे कारण पत्नी ट्रान्सजेंडर असल्याचे सांगितले जात आहे. आता न्यायालयाने पत्नीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल करुन आपला विवाह रद्द ठरवण्याची विनंती केली आहे.

पतीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आरोप केला आहे की, त्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र लग्नानंतर (Marriage) पत्नीने त्याला शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत.

डॉक्टरांनी तपासणी केली असता पत्नीच्या शरीराचे अनेक बॉडी पार्ट्स डेवलप झाले नसल्याचे समोर आले. इतकंच नाही तर पत्नीला टक्कल आहे.

Court
Supreme Court: 'हे एकच प्रकरण नाही, आणखी महिला...'; मणिपूरवरील सुनावणीदरम्यान CJI नी मागितली आकडेवारी

पाच डॉक्टरांचे पॅनेल

हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत न्यायालयाने सीएमओला पाच डॉक्टरांचे (Doctors) पॅनल तयार करुन पत्नीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांनी सीएमओला तपास अहवाल तात्काळ न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर सीएमओने पाच डॉक्टरांचे एक पॅनल तयार केले असून ते शुक्रवारी पत्नीची तपासणी करतील.

पतीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता

या प्रकरणी पतीने 2021 मध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला होता, परंतु तपासकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी न करताच या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला होता. आता पतीनेही या अहवालाला न्यायालयात आव्हान दिले आहे.

Court
Kolkata High Court: शिवलिंग हटवा...आदेश लिहिताना रजिस्ट्रार बेशुद्ध पडला; न्यायाधीशांनी बदलला निर्णय

या आधारे घटस्फोट घेता येईल, असे वकिलाने सांगितले

कानपूरमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्येष्ठ वकील विजय बक्षी यांनी सांगितले की, कायद्यानुसार जर पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसेल तर या आधारे घटस्फोट घेता येतो. सध्या, पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 12 अंतर्गत विवाह रद्द घोषित करण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com