
भारतीय इन्कम टॅक्स विभागाकडून कर (Tax) कपात करणार्या कोणत्याही व्यक्तीकडे कर भरताना टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर (Tax Deduction Account Number - TAN) असणं गरजेचं असतं. हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असतो, जो भारतीय प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) द्वारे जारी केला जातो.
प्रत्येक करदात्याचं टॅनकार्ड (Tan Card) असणं गरजेचं आहे. पॅनकार्ड प्रमाणेच टॅनकार्डवर 10 अंकी अल्फा-न्यूमेरिक (अक्षरं आणि क्रमांक असलेला) ओळख क्रमांक असतो. पॅनकार्ड आणि टॅनकार्ड दोन्ही दिसायला सारखीच असली, तरी या दोन्ही कार्डचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.
प्रत्येक वेळी प्राप्तिकर संग्राहक (Tax Collector) कराची रक्कम अधिकाऱ्यांकडे जमा करतो, त्यावेळी टॅन क्रमांक (TAN Number) खूप आवश्यक असतो. जोपर्यंत टॅन क्रमांक नमूद केला जात नाही तोपर्यंत, आयकर विभाग कोणताही टीडीएस रिटर्न (TDS Return) आणि पेमेंट स्वीकारत नाही.
टॅनकार्ड कोणासाठी आवश्यक आहे?
टॅन कार्ड मुख्यतः त्या व्यक्ती किंवा संस्थांसाठी असतो जे कर (TDS/TCS) वजावट करतात किंवा गोळा करतात, जसे की: कंपन्या आणि व्यवसाय (ज्या कर्मचाऱ्यांचा TDS वजा करतात), सरकारी संस्था आणि बँका, स्वतःच्या नावावर घर खरेदी करणारे लोक (जर TDS लागू असेल तर), ठेवीवरील (Fixed Deposit) व्याजावर TDS वजा करणाऱ्या संस्था.
टॅनकार्ड कशासाठी वापरले जाते?
TDS (Tax Deducted at Source) आणि TCS (Tax Collected at Source) संबंधित व्यवहारांसाठी आवश्यक असतो. सरकारी तिजोरीत टॅक्स भरताना टॅन नंबर अनिवार्य असतो. टॅक्स वजावट करणाऱ्या संस्था TAN वापरून TDS रिटर्न्स भरतात. सरकारला कर संकलनाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी टॅनकार्ड आवश्यक आहे.
टॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
अधिकृत NSDL-TIN वेबसाइटवर जा.
सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करून 'TAN' वर क्लिक करा.
TAN अंतर्गत 'ऑनलाइन अर्ज करा' पर्यायावर क्लिक करा.
नवीन TAN साठी किंवा बदल/सुधारणा हे पर्याय वापरू शकता.
फॉर्ममधील सर्व माहिती योग्य पध्दतीनं भरा.
आवश्यक शुल्क भरा आणि 'सबमिट' वर क्लिक करा.
फी भरल्यानंतर स्क्रीनवर 14 अंकांचा पावती क्रमांक येईल. या क्रमांकाच्या आधारे TAN च्या स्थितीची माहिती घेऊ शकता. टॅनकार्ड, पॅनकार्ड प्रमाणेच घरपोच मिळतं.
नवीन TAN साठी प्रक्रिया शुल्क, तसेच TAN मधील बदल करण्यासाठी 65 रुपये शुल्क आकारले जाते. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे TAN साठीची फी भरू शकता. फी भरल्यानंतर स्क्रीनवर 14 अंकांचा पावती क्रमांक येईल. या क्रमांकाच्या आधारे TAN च्या स्थितीचा मागोवा घेऊ शकता. टॅनकार्ड, पॅनकार्ड प्रमाणेच घरपोच मिळते.
टॅन नंबर हा TDS/TCS वजावट करणाऱ्या व्यक्ती, व्यवसाय किंवा संस्थांसाठी अनिवार्य असतो. तो पॅन कार्डपेक्षा वेगळा असून, मुख्यतः कर वजावट आणि संकलनाच्या प्रक्रियेसाठी वापरला जातो. जर तुम्ही व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये TDS/TCS वजा करत असाल, तर तुम्हाला टॅनकार्ड घ्यावे लागेल.
सामान्य व्यक्तींना टॅन नंबरची गरज नसते, पण जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा कर्मचारी ठेवत असाल, तर टॅन अनिवार्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.