
PM Kisan Samman Nidhi Yojana
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रूपये अनुदान दिले जाते, जे 2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेसाठी संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी KYC (Know Your Customer) अपडेट करणे बंधनकारक आहे. जर तुमचे e-KYC पूर्ण नसेल, तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
बोगस लाभार्थी टाळण्यासाठी, अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी KYC अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
PM किसान KYC कशी करायची?
तुम्ही घरी बसून ऑनलाइन e-KYC करू शकता.
अधिकृत PM किसान वेबसाइटला भेट द्या – https://pmkisan.gov.in/
e-KYC पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक टाका आणि OTP सत्यापित करा.
KYC पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.
तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
जर ऑनलाइन KYC होत नसेल, तर CSC (Common Service Center) किंवा नजीकच्या बँक शाखेत जाऊन KYC अपडेट करू शकता.
लाभ कोणाला मिळतो?
भारताचा नागरिक असणे आवश्यक.
लहान आणि मध्यम शेतकरी पात्र.
ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे, त्यांना लाभ मिळतो.
योजनेत नाव नोंदणी करताना आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन मालकीचे दस्तऐवज आवश्यक.
योजनेसाठी कोण पात्र नाही?
सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त अधिकारी.डॉक्टर, अभियांत्रिकी, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यासारखे व्यावसायिक तसंच ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे किंवा ज्यांच्याकडे १०,००० रुपये पेक्षा जास्त पेन्शन आहे असे लोक पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र नसतात.
योजनेत नाव कसे नोंदवावे?
https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
"New Farmer Registration" वर क्लिक करा.
आधार क्रमांक आणि आवश्यक माहिती भरा.
बँक खाते आणि शेतीच्या जमिनीची माहिती द्या.
फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची स्थिती तपासा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.