H3N2 Influenza Virus: भारतात H3N2 विषाणूमुळे दोघांचा मृत्यू, ही आहेत लक्षणं

भारतात आतापर्यंत फक्त H3N2 आणि H1N1 चे विषाणू आढळून आले आहे.
H3N2 Influenza Virus
H3N2 Influenza VirusDainik Gomantak
Published on
Updated on

H3N2 Influenza Virus: कोरोनानंतर (Corona) देशात आता H3N2व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

 एका अहवालानुसार, कर्नाटकातील हसनमधील 82 वर्षीय व्यक्ती हा देशातील H3N2 ने मृत्यू पावणारा पहिला व्यक्ती आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेंट गौडा यांना 24 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 1 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता असे सांगण्यात येत आहे.

देशात H3N2 व्हायरसची सुमारे 90 प्रकरणे नोंदली गेली आहेत. H1N1 विषाणूचेही आठ रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशात फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. बहुतेक संक्रमण H3N2 व्हायरसमुळे झाले असुन त्याला 'हाँगकाँग फ्लू' असेही म्हणतात. हा विषाणू देशातील इतर इन्फ्लूएंझा उप-प्रकारांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे.

H3N2 इन्फ्लूएंझाची लक्षणे कोणती?

- श्वासोच्छवासाचा त्रास
- सतत ताप येणे
- छाती किंवा पोटदुखी
- स्नायू दुखणे
- अशक्तपणा आणि चक्कर येणे
- जुन्या आजाराची पुनरावृत्ती
- सर्दी आणि खोकला

H3N2 Influenza Virus
Bihar : पोलिसही घाबरले! खून होणार म्हणत, पोलिसांसमोरच झाल्या तीन हत्या
  • H3N2 व्हायरस या लोकांसाठी अधिक धोकादायक

- 5 वर्षांखालील लहान मुले
- 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची वृद्ध
- गर्भवती महिला
- श्वसन आणि दमा रुग्ण
- मधुमेह रुग्ण
- कर्करोग रुग्ण

H3N2 व्हायरस पासून असा करावा बचाव

  1. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे

  2. खोकताना आणि शिंकताना नाकाला रुमाल लावावा

  3. प्रदूषित ठिकाणी जाणे टाळावे

  4. बाहेर तळलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे

  5. हात नेहमी धुत रहावे

  6. जास्त पाणी प्यावे

  7. ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.

  8. ताप 2-3 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com