Gujarat Earthquake: गुजरातवर दुहेरी संकट; वादळासोबतच भुकंपाचे धक्के

Gujarat Earthquake An earthquake of magnitude 3 8 on the Richter scale South of Rajkot
Gujarat Earthquake An earthquake of magnitude 3 8 on the Richter scale South of Rajkot
Published on
Updated on

गांधीनगर: गुजरातच्या राजकोटमध्ये(Gujarat Rajkot) भूकंपाचे धक्के( Earthquake) जाणवले आहेत. नॅशनल  सिस्मोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, रिश्टर स्केलवर(Richter scale ) त्याची तीव्रता 3.8 होती. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. गुजरात सध्या वादळाच्या संकटाला(cyclone tauktae) सामोरे जात आहे, गुजरातमध्ये या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पण या सर्वांच्या मधे एक नवीन संकट आले आहे. नॅशनल  सिस्मोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या(National Seismological Research Institute) म्हणण्यानुसार,  राजूला जाफराबाद तालुक्यात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के पहाटे 3च्या सुमारास जाणवले.(Gujarat Earthquake An earthquake of magnitude 3 8 on the Richter scale South of Rajkot )

लोकांमध्ये भीतीचे वातावरण

गुजरातमधील या भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे आणि लोक घराबाहेर पडले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.8 होती. सकाळी 3 च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. प्राप्त माहितीनुसार ग्रामीण भागात हे भूकंपाचे धक्के जास्तीत जास्त लोकांना जाणवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.

याआधी  तीन भूकंप एकत्र 
यापूर्वीही 15 जून 2020 रोजी गुजरातमध्ये 24 तासांत तीनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहिला धक्का रात्रीच्या वेळी 5.5 रिश्टर स्केलचा झाला होता. यानंतर कच्छमध्ये त्याच दिवशी दुपारी  चारच्या दरम्यान आणखी दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता 4.6 आणि 4.1 होती. 

 गुजरातमध्ये मुसळधार पाऊस
गुजरात सध्या वादळाच्या संकटाला सामोरे जात आहे, या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या गुजरातच्या किनारपट्टी भागात जोरदार वादळी वाऱ्यायासह मुसळधार पाऊस पडत आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरातवर वादळाचा धोका कायम आहे. आता हे वादळ उत्तर, वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 17 आणि 18 मे रोजी सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीवरील शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 18 मे रोजी सौराष्ट्र आणि कच्छ आणि दक्षिण गुजरात प्रदेशात वाऱ्याचा वेग ताशी100 किलोमीटर राहील. सरकारने एनडीआरएफच्या दोन संघांना राजकोट येथे पाठवले असून काही पथकांना स्टॅंड बाय  ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com