
केरळची राजधानी तिरुअनंतपुरममधील नेय्याट्टिनकारा येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी (17 जानेवारी) 24 वर्षीय ग्रीष्मा हिला 2022 मध्ये शेरोन राजच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. ज्याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. या प्रकरणातील शिक्षा 20 जानेवारी रोजी म्हणजेच सोमवारी सुनावण्यात आली. न्यायालयाने ग्रीष्माला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या घटनेच्या जवळजवळ दोन वर्षांनंतर न्यायालयाने आपला फैसला सुनावला. तर दुसरीकडे, न्यायालयाने ग्रीष्माची आई सिंधू हिला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले, परंतु तिचा काका निर्मलकुमारन नायर, जो दुसरा आरोपी होता, त्याला गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल दोषी ठरवले.
गेल्या आठवड्यात ग्रीष्मा आणि तिच्या काकाला हत्येसाठी दोषी ठरवणाऱ्या सत्र न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की, गुन्ह्याच्या गांभीर्यापेक्षा आरोपीचे वय विचारात घेण्याची गरज नाही. आरोपीने (Accused) तिची शैक्षणिक कामगिरी, पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसणे आणि ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी असल्याचे सांगत सौम्य शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे, गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी परिस्थितीजन्य, डिजिटल आणि वैज्ञानिक पुराव्यांवर अवलंबून राहून न्यायालयात आपली बाजू मांडली. दरम्यान, न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर पीडितेच्या वकिलाने सांगितले की, त्यांना "विश्वास" आहे की न्यायालय पुरावे स्वीकारेल.
सरकारी वकिलांकडून ग्रिष्मा आणि तिच्या काकांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. तर ग्रिष्माच्या वकिलांकडून सांगण्यात आले की, प्रियकर शेरोन राजकडे ग्रीष्माचे फोटो होते, ज्याच्या आधारे तो ग्रीष्माला ब्लॅकमेल करत होता. या कारणास्तव, ग्रिष्माने शेरोनचा खून करण्याचा कट रचला. बचाव पक्षाने पुढे असेही म्हटले की, ग्रीष्माला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे. तिचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. ती तिच्या पालकांची एकुलता एक मुलगी आहे. तथापि, तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेरोनने ग्रिष्माला ब्लॅकमेल केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. ग्रिष्माला आयपीसीच्या कलम 302, 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, 14 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्माने शेरोनला तामिळनाडूतील (Tamil Nadu) कन्याकुमारी येथील तिच्या घरी बोलावले होते. शेरोन केरळमधील तिरुवनंतपुरम येथील रहिवासी होता. यादरम्यान ग्रिष्माने आयुर्वेदिक काढ्यात विष मिसळले आणि शेरोनला ते प्यायला लावले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. खरंतर, ग्रिष्मा आणि शेरोनमध्ये प्रेमसंबंध होते, पण ग्रिष्माचे लग्न ठरले होते आणि तिला शेरोनपासून सुटका हवी होती. असा दावा केला जातो की, शेरोन ग्रीश्माला सोडण्यास तयार नव्हता. तो त्याच्याकडे असणारे तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असत. हेच कारण ठरले की, ग्रिष्माने शेरोनला मारण्याचा कट रचला आणि त्याला विष दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.