AIIMS Facilities: रुग्णांसाठी मोठी बातमी, आता एम्समध्ये मिळणार 'या' सुविधा

AIIMS Online Appointment: देशातील सर्वात विश्वासार्ह रुग्णालय असलेल्या एम्सने रुग्णांच्या हितासाठी काही नवीन पावले उचलली आहेत.
AIIMS
AIIMS Dainik Gomantak
Published on
Updated on

AIIMS Facilities: देशातील सर्वात विश्वासार्ह रुग्णालय असलेल्या एम्सने रुग्णांच्या हितासाठी काही नवीन पावले उचलली आहेत. सर्वात मोठे पाऊल म्हणजे एम्समध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सामान्य बेड 10% ने वाढवता येतात, तर ICU बेड 30% पर्यंत वाढवता येतात.

जनसंपर्क विभागाच्या प्रमुख डॉ. रीमा दादा यांच्या मते, एम्सने नुकताच स्वतंत्र माता बाल विभाग सुरु केला आहे. याशिवाय सर्जरी विभाग, वृद्धांसाठी जेरियाट्रिक मेडिसिन, (Geriatric Medicine) प्लास्टिक सर्जरी आणि बर्न विभाग नुकताच वेगळा करण्यात आला असून, त्यामुळे खाटांची संख्या वाढली आहे.

त्याचबरोबर, एम्समध्ये स्वतंत्रपणे 3000 खाटा वाढवण्यात येणार आहेत. त्यापैकी 300 खाटा केवळ आपत्कालीन रुग्णांसाठी (Patients) असतील.

AIIMS
Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल

रुग्णांसाठी खास सोय

रुग्णांची गर्दी कमी करण्यासाठी एम्सच्या मुख्य गेटवर आणि कॅम्पसच्या आतील भागात खास सोय करण्यात आली आहे. मात्र गेटवर जमलेली रुग्णांची गर्दी तशीच आहे. सध्या भारतात (India) दिल्ली व्यतिरिक्त 17 वेगवेगळ्या AIIMS वेगवेगळ्या टप्प्यात काम करत आहेत. परंतु अनेक एम्स पूर्णपणे कार्यरत नसल्यामुळे रुग्णांना दिल्लीला पाठवतात.

तसेच, बिहारमधील दरभंगा येथून आलेले सत्यनारायण मिश्रा 2012 पासून वेगवेगळ्या आजारांसाठी एम्समध्ये जात आहेत. एम्सच्या अनेक महिने आणि वर्षांच्या तारखा असूनही त्यांचा उपचारावर विश्वास आहे. सत्यनारायण मिश्रा यांचा कॅन्सर एम्सच्या उपचाराने बरा झाला असून आता त्यांच्यावर हृदयविकारावर उपचार सुरु आहेत.

AIIMS
Cyber Attack: सायबर धोका वाढला, AIIMS नंतर 'ही' सरकारी वेबसाईट हॅकर्सच्या निशाण्यावर!

त्याचबरोबर, रुग्णांना माहिती देण्यासाठी एम्सच्या मुख्य गेटवर हेल्पलाइन काउंटरही सुरु करण्यात आले आहे. मात्र, हे काउंटर कोणत्याही रुग्णाला उपचार, चाचण्या आणि ऑपरेशनसाठी मिळणाऱ्या अनेक महिन्यांच्या तारखा कशा कमी करता येतील हे सांगू शकलेले नाही.

एम्सने ही पावले उचलली आहेत

एम्समध्ये 1 मार्चपासून मिलेट्स कॅन्टीन सुरु होत आहे, ज्यामध्ये खाद्यपदार्थ आणि स्नॅक्स उपलब्ध असेल. उर्वरित कॅन्टीनमध्येही हेल्दी फूडचे पर्याय जोडले जातील.

ई-कॅज्युअल्टी म्हणजेच इमर्जन्सीमध्ये किती बेड उपलब्ध आहेत, ते ऑनलाइन पाहता येईल. मुख्य वेबसाइटवर आपत्कालीन डॅशबोर्ड पर्याय उपलब्ध आहे. मात्र, सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे ही लिंक काम करत नाही.

AIIMS
AIIMS मध्ये 159 पदांसाठी भरती; जाणून घ्या शेवटची तारीख

त्याचप्रमाणे, एम्समधील खाटा वाढवण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूदीची प्रतीक्षा आहे. म्हणजेच, रुग्णांना दिलासा देणार्‍या योजना कागदावर आल्या आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी काही महिने लागू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com