'पिता तुझा देव, ते बीज तुम्ही वृक्ष', वृद्ध पित्याला भत्ता द्यावाच लागेल; हायकोर्टाने मुलाला झापलं

Jharkhand High Court: उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाची पुष्टी केली, ज्यामध्ये मुलाने वडिलांना देखभाल म्हणून दरमहा 3000 रुपये देण्याचे आदेश दिले होते.
Court
CourtDainik Gomantak

Jharkhand High Court: झारखंड उच्च न्यायालयाने नुकताच आपल्या एका निर्णयात मुलाला आपल्या वृद्ध वडिलांच्या देखभालीसाठी कोणत्याही परिस्थितीत पैसे द्यावे लागतील, असा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाच्या निर्णयाची पुष्टी केली, ज्यामध्ये मुलाने वडिलांना देखभाल म्हणून दरमहा 3000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाविरोधात मनोज नावाच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती सुभाष चंद यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, “दोन्ही पक्षांनी सादर केलेले पुरावे जरी दाखवतात की वडिलांकडे काही शेतजमीन आहे, तरीही ते शेती करण्यास असहाय्य आहेत. ते त्यांच्या मोठ्या मुलावरही विसंबून आहेत, ज्याच्यासोबत ते राहतात. वडिलांनी त्यांचा धाकटा मुलगा मनोज साव याला संपूर्ण मालमत्तेत समान वाटा दिला, परंतु त्यांचा धाकटा मुलगा मनोज याने 15 वर्षांहून अधिक काळ त्यांच्या भरणपोषणासाठी पैसै दिले नाहीत. वडील काही कमावत असले तरी; आपल्या वृद्ध वडिलांना सांभाळणे हे पुत्राचे कर्तव्य आहे.”

Court
Delhi High Court: बलात्काराच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी विवाहाची ढाल; संतापजनक प्रकार वाढत असल्याने कोर्टाने फटकारले

हिंदू धर्मात असलेले पालकाचे महत्त्व अधोरेखित करताना न्यायमूर्ती चंद यांनी आपल्या आदेशात म्हटले की, “जर तुमचे पालक सशम, सशक्त असतील तर तुम्हालाही सशक्त वाटते, जर ते दु:खी असतील तर तुम्हाला देखील वाईट वाटते. ते बीज असतील तर तुम्ही वृक्ष आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पालकांचे चांगले आणि वाईट दोन्ही वारशाने मिळते. कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या जन्मामुळे काही ऋण असतात आणि त्यात पितृ ऋण आणि मातृ ऋण (आध्यात्मिक) देखील समाविष्ट असते जे आपल्याला कोणत्याही किंमतीत फेडावे लागते.''

याआधी फॅमिली कोर्टाने धाकट्या मुलाला वडिलांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 3 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. याविरोधात धाकट्या मुलाने अपील केले होते. फॅमिली कोर्टाने याचिकाकर्त्या वडिलांनी आपल्या धाकट्या मुलाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 अंतर्गत भरणपोषण अर्ज दाखल केला होता. वडिलांनी अर्जात दावा केला होता की, त्यांना दोन मुले आहेत आणि धाकटा मुलगा भांडखोर आहे. तो त्यांच्याशी क्रूरपणे वागतो आणि मारहाणही करतो.

Court
Delhi High Court: किशोरवयीन प्रेम नियंत्रणाबाहेर, निर्णय देताना न्यायालयाने काळजी घ्यावी!

याचिकाकर्त्या वडिलांनी दावा केला होता की, 21 फेब्रुवारी 1994 रोजी त्यांनी 3.985 एकर जमीन त्यांच्या दोन मुलांमध्ये समान वाटून दिली होती. या याचिकेत म्हटले आहे की, मोठा मुलगा वडिलांना आर्थिक मदत करतो, तर लहान मुलगा वडिलांकडे दुर्लक्ष करतो आणि अनेकवेळा मारहाणही करतो. वडिलांनी दावा केला होता की, धाकटा मुलगा गावातील दुकानातून दरमहा सुमारे 50,000 रुपये कमावतो, याशिवाय, त्याला शेतीतून (Agriculture) वार्षिक 2 लाख रुपये मिळतात. वृद्ध वडिलांनी आपल्या लहान मुलाला दरमहा 10,000 रुपये देखभाल भत्ता देण्याची विनंती केली होती. त्यावर फॅमिली कोर्टाने मुलाने वडिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.

Court
Delhi High Court: गँगरेप पीडिता 27 आठवड्यांची गरोदर, कोर्टाने दिली गर्भपाताची परवानगी; जाणून घ्या प्रकरण

उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायमूर्ती चंद यांनी आपल्या निकालात महाभारतातील यक्ष युधिष्ठिर संवाद उद्धृत केला आणि लिहिले, महाभारतात यक्षाने युधिष्ठिरला विचारले: “पृथ्वीपेक्षा जड काय आहे? स्वर्गापेक्षा उंच काय आहे? हवेपेक्षा क्षणभंगुर काय आहे? आणि गवतापेक्षा जास्त काय आहे? युधिष्ठिराने उत्तर दिले: 'माता पृथ्वीपेक्षा जड आहे; पिता स्वर्गापेक्षा उंच आहे; मन हवेपेक्षा क्षणभंगुर आहे; आणि आपले विचार गवतापेक्षाही असंख्य आहेत.'' यावर स्पष्टीकरण देत उच्च न्यायालयाने मुलाला त्याचे पवित्र कर्तव्य बजावण्याचे आदेश दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com