Earthquake In Andaman Islands: अंदमानमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 5.8 तीव्रता

रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ही माहिती दिली आहे.
Earthquake  Andaman Islands
Earthquake Andaman IslandsDainik Gomantak
Published on
Updated on

Earthquake In Andaman Islands: आज सकाळी 12:53 वाजता अंदमान बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ही माहिती दिली आहे. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

काही दिवसांपूर्वी दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये भीषण भूकंप झाला होता. त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. परंतु आता त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंप झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारत तसेच पश्चिमी प्रदेशात सातत्याने होत असलेल्या भूकंपाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता नागरिकांना सावधानतेच्या सूचना करण्यात आल्या आहे.

  • भूकंपाचे कारण काय?

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात.

आता हा 50 किलोमीटर जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागला गेला आहे. म्हणजेच पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग 7 टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे.

या प्लेट्स कधीही स्थिर नसतात, त्या सतत फिरत राहतात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा त्या एकमेकांवर आदळतात.

काही वेळा या प्लेट्सही तुटतात. त्यांच्या धडकेमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे परिसरात एकच धक्के जाणवतात.

कधी कधी हे धक्के खूप कमी तीव्रतेचे असतात त्यामुळे ते जाणवतही नाहीत. कधीकधी ते इतक्या तीव्रतेचे असतात की पृथ्वीचा स्फोट होतो.

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com