Jaipur Crime News: दारुड्या बापाचं घृणास्पद कृत्य, कर्ज फेडण्यासाठी 4 वर्षाच्या मुलीला...!

Crime News: मुलीला गहाण ठेवून मद्यपी बापाने डोक्यावरचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील जयपूरमध्ये या संतापजनक घटनेची नोंद करण्यात आली आहे.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Drunkard Father Pawned Daughter: राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे बाप आणि मुलीच्या पवित्र नात्याला लाजवेल असे काम एका मद्यधुंद बापाने केले आहे.

मद्यपी बापाला दारुचे व्यसन इतके जडले होते की, त्याने त्यासाठी कर्ज काढण्यास सुरुवात केली. कर्जाचा डोंगर वाढल्यावर त्याने आपल्या 4 वर्षाच्या मुलीला एका सावकाराकडे गहाण ठेवले.

मुलीला गहाण ठेवून मद्यपी बापाने डोक्यावरचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील जयपूरमध्ये या संतापजनक घटनेची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयपूरमधील (Jaipur) एक व्यक्ती त्याची पत्नी, 4 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षाच्या मुलासोबत राहत होता. तो मजूरी करायचा. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते.

दारुचे व्यसन असलेल्या या नराधमाने आपले घाणेरडे व्यसन पूर्ण करण्यासाठी कर्ज काढण्यास सुरुवात केली होती.

वाढत्या कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने आपल्या 4 वर्षाच्या मुलीला सावकाराच्या स्वाधीन केले. ही मुलगी ज्याच्याकडे गहाण ठेवली होती, तो तिला भीक मागायला पाठवत असे.

Crime News
Madhya Pradesh: रामकथेचं आयोजन करणं पडलं महागात, कथावाचकाच्या पट्टशिष्याने पळवली बायको

मुलांचे समुपदेशन

मुलीच्या भावाने तिला तेथून बाहेर काढले आणि कोटा येथे नेले. त्यानंतर दोन्ही मुले रस्त्यावर फिरताना आढळली.

कोटा येथील रेल्वे कॉलनीत फिरत असताना एका नगरसेवकाने या दोन्ही मुलांना पाहिले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

बालकल्याण समितीचे सदस्य अरुण भार्गव यांनी या मुलांचे समुपदेशन केले. समुपदेशनादरम्यान समोर आलेल्या गोष्टी ऐकून सर्वांनाच लाज वाटेल.

6 वर्षाच्या मुलाने सांगितले की, त्याची आई अपंग आहे, वडिलांना दारुचे व्यसन आहे. दारुड्या वडिलांनी कर्ज (Loan) फेडण्यासाठी आपल्या 4 वर्षांच्या बहिणीला गहाण ठेवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com