महामानवाचा महापरिनिर्वाण दिन!

स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि संविधान निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. भीमराव आंबेडकर (B. R. Ambedkar) यांची आज पुण्यतिथी आहे.
dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan 2021
dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि संविधान निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. भीमराव आंबेडकर (B. R. Ambedkar) यांची आज पुण्यतिथी आहे. मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेले आंबेडकर त्यांच्या 14 भावंडांमध्ये सर्वात लहान होते. 1897 मध्ये, त्यांचे कुटुंब तत्कालीन सेंट्रल प्रोव्हिन्समधून मुंबईत आले, जिथे आंबेडकरांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. मॅट्रिकनंतर त्यांनी 1907 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1912 मध्ये त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी मिळवली.

1913 मध्ये बडोदा राज्य शिष्यवृत्तीच्या मदतीने ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकण्यासाठी गेले. 1915 मध्ये, त्यांनी मुख्य विषय म्हणून अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र या विषयांसह एमए केले. त्यानंतर 1916 मध्ये त्यांनी 'नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टोरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी' या विषयावर एम.ए.साठी दुसरा प्रबंध लिहिला. यानंतर तिसर्‍या प्रबंधावर त्यांनी 1927 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.

dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan 2021
Omicron चा भडका एकाच दिवसात देशात 18 रुग्ण, केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाइंस

कोलंबियानंतर डॉ.आंबेडकर लंडनला गेले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 1921 मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि 1923 मध्ये DSAC पदवी घेतली. दुहेरी डॉक्टरेट केलेल्या आंबेडकरांना 1953 मध्ये कोलंबियातून 1952 मध्ये उस्मानियातून मानद डॉक्टरेट देण्यात आली होती. भारतात परतल्यानंतर त्यांनी दलित हक्क, अस्पृश्यता, महिलांच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढा दिला. त्यांची व्यापक पात्रता लक्षात घेऊन त्यांना भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले.

मृत्यूच्या काही काळापूर्वी, 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी लाखो दलित समर्थकांसह बौद्ध धर्म स्वीकारला. डॉ.आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी हे जग सोडले. हा दिवस महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Diwas 2021) म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com