Digvesh Rathi: आयपीएलमधील वादानंतर दिग्वेश राठीची पुन्हा तीच चूक, DPL मध्ये फलंदाजासोबत बाचाबाची; VIDEO व्हायरल

Digvesh Rathi Viral Video: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये आपल्या वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत राहिलेला क्रिकेटपटू दिग्वेश राठी (Digvesh Rathi) पुन्हा एकदा चर्चेत आला.
Digvesh Rathi Viral Video
Digvesh RathiDainik Gomantak
Published on
Updated on

Digvesh Rathi Viral Video: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये आपल्या वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत राहिलेला क्रिकेटपटू दिग्वेश राठी (Digvesh Rathi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्ये खेळताना एका फलंदाजासोबत गैरवर्तन केल्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 5 ऑगस्ट रोजी वेस्ट दिल्ली लायन्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, ही घटना वेस्ट दिल्ली लायन्सच्या डावाच्या पाचव्या षटकात घडली, जेव्हा दिग्वेश राठी साऊथ दिल्ली सुपरस्टार्सकडून गोलंदाजी करत होता. हे राठीचे सामन्यातील दुसरे षटक होते. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी वेस्ट दिल्लीचा फलंदाज अंकित कुमार (Ankit Kumar) त्याच्या क्रीजमधून बाजूला झाला. यामुळे राठी आणि अंकित यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Digvesh Rathi Viral Video
IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

फलंदाजाचे चोख प्रत्युत्तर

या वादामुळे राठी संतापलेला असताना अंकित कुमारने त्याला आपल्या फलंदाजीनेच उत्तर दिले. राठीच्या तिसऱ्या षटकात अंकितने दोन गगनचुंबी षटकार लगावले आणि राठीच्या दिशेने दोन बोटांचा इशारा केला. यामुळे राठी आणखीनच चिडला. या सामन्यात राठीला आपली गोलंदाजी प्रभावी ठेवता आली नाही. त्याने तीन षटकांत 33 धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.

दुसरीकडे, अंकित कुमारने राठीच्या आक्रमकतेला शांतपणे प्रत्युत्तर दिले आणि अवघ्या 46 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 96 धावांची शानदार खेळी केली. अंकितच्या या तुफानी खेळीमुळे वेस्ट दिल्ली लायन्सने हा सामना 8 गडी राखून जिंकला.

Digvesh Rathi Viral Video
IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

आयपीएलमध्येही वाद

दिग्वेश राठीच्या वादग्रस्त वर्तनाची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी आयपीएल 2025 मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग असताना, सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मासोबत त्याची बाचाबाची झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) त्याच्यावर बंदीची कारवाईही केली होती. दिग्वेश राठीने त्या आयपीएल हंगामात एकूण 14 विकेट घेतल्या होत्या. या प्रकारामुळे, त्याच्या मैदानातील वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com