Coronavirus: ‘’लॉकडाऊन एकमेव पर्याय’’ 

 Coronavirus The only option to lockdown
Coronavirus The only option to lockdown

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अशातच आता कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला (Modi Government) सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन मोदी सरकारला देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट म्हटले की, भारत सरकारच्या लक्षात येत नाही का, देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lockdown) हा एकमेव उपाय आहे. मात्र समाजातील काही घटकांना न्याय योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.  (Coronavirus The only option to lockdown)

राहुल गांधी यांनी आत्तापर्यंत देशात लॉकडाऊन लावण्यास विरोध केला होता. गेल्या वर्षी जेव्हा देशात मोदी सरकारने लॉकडाऊन लावला होता त्यावेळी राहुल गांधींनी सरकारवर जोरदार टिका केली होती. राहुल गांधी यांनी याआगोदर बऱ्याचदा सांगितलं होतं की, लॉकडाऊनमुळे कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होतो मात्र कोरोनाचा नायनाट होणार नाही. मात्र राहुल गांधी यांनी आपली भूमिका बदलत देशात लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून देशात दररोज तीन लाखांच्या वर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशामधील अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहे. महाराष्ट्र, ओडिशा, दिल्ली उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक राज्यांनी विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदीही लागू केली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com