Mukharjee Nagar Fire Video : तिसऱ्या मजल्यावरुन उड्या मारत विद्यार्थ्यांनी वाचवला जीव; अंगावर काट आणणारे दृश्य

दिल्ली पोलिसांनी सांगितले की आग एका मीटरमध्ये लागली आणि धूर वर गेल्यावर विद्यार्थी खाली पळू लागले.
Mukharjee Nagar Fire
Mukharjee Nagar FireDainik Gomantak
Published on
Updated on

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्लीतील मुखर्जी नगरमधील कोचिंग सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी आग लागली. तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी खिडकी तोडून दोरीला लटकत खाली येऊ लागले. मुखर्जी नगर हा दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता होती.

फक्त मुलेच नाही तर मुलीही विंडो एसीच्या मदतीने खाली उतरल्या. दोन्ही बाजूंनी दोरीला लटकलेले विद्यार्थी एक एक करून खाली उतरत होते. 'संस्कृती कोचिंग सेंटर'मध्ये गुरुवारी दुपारी 12 नंतर आग लागली होती.

या गोंधळात अनेक मुली आणि मुले जखमी झाली आहेत. काही मुले दोरीला लटकत असताना घसरली आणि जखमी झाली. हे भीषण दृश्य पाहून खाली लोकांची गर्दी झाली. खाली उभे असलेले लोक विद्यार्थ्यांना सावध करत होते. अग्निशमन दलाच्या 11 गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

हा तर विद्यार्थ्यांचा अड्डा

मुखर्जी नगर परिसर आयएएस परीक्षेच्या तयारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. याला तुम्ही क्लास वनच्या नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांचा अड्डा समजा. सरकारी नोकरीच्या तयारीसाठी येथे अनेक कोचिंग सेंटर्स आहेत.

येथील रस्त्यावर पुस्तकांची दुकाने भरलेली आहेत. जूबाजूला विद्यार्थी आणि चहाची दुकाने दिसतील. मुखर्जी नगर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी गजबजलेले असते.

Mukharjee Nagar Fire
Odisha Train Accident : ...तर 288 निष्पापांचे प्राण वाचले असते! CBI कडून चौकशी सुरू असतानाच समोर आली धक्कादायक माहिती

म्हणून परिसराला मुखर्जी नगर म्हणतात...

फाळणीनंतर हडसन लेन, आउटराम लेन आणि किंग्सवे कॅम्प भागात पुनर्वसन वसाहती उभारण्यात आल्या. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावावरून याला नंतर मुखर्जी नगर म्हटले जाऊ लागले.

काही वर्षांपूर्वी आलेल्या एका अहवालानुसार मुखर्जी नगरमध्ये दररोज सुमारे 3 लाख लोक राहतात किंवा येतात, त्यामुळे घरभाडे, वीजबिल, पाणी बिल, टिफीन याबाबत बरीच चर्चा होते. आयएएस झाल्यानंतरही अनेकजण मुखर्जीचे कौतुक मोठ्या उत्साहाने सांगतात.

Mukharjee Nagar Fire
Brijbhushan Singh: कुस्तीपटूंना न्याय मिळणार का? POSCO प्रकरणात ब्रिजभूषण यांना क्लीन चिट; पोलिसांनी दाखल केला क्लोजर रिपोर्ट

मुखर्जी नगर म्हणजे मिनी इंडियाच...

काही लोक मुखर्जी नगरला मिनी इंडिया म्हणून संबोधतात, कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येथे चांगल्या नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. ज्या विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात वसतिगृह मिळत नाही ते येथे राहण्यासाठी येतात.

हिंदी भाषिक विद्यार्थी इथे जास्त संस्खेने दिसतात. चांगली अर्थिक परिस्थिती असलेले विद्यार्थी राजेंद्र नगर व इतर ठिकाणी कोचिंगसाठी जातात. मात्र, ज्यांची अर्थिक परिस्थिती बेताची आहे ते मात्र मुखर्जी नगरला पसंती देतात.

येथे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायदेशीर अशी यंत्रणा निर्माण झाली आहे. यामध्ये चहाच्या टपरीपासून मोठ मोठ्या क्लासेसचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com