
Cheteshwar Pujara Retirement
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. पुजाराने सोशल मीडियाद्वारे त्याच्या निवृत्तीची माहिती दिली. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. चेतेश्वरने टीम इंडियासाठी १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारतासाठी अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.
२०१० मध्ये बेंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. पुढे २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायो येथे एकदिवसीय सामन्यात पदार्पण झाले. जरी त्याची वनडे कारकीर्द मोठी ठरली नाही, तरी कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल १३ वर्षे त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरला.
सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा करताना पुजाराने भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. त्याने लिहिले की, “भारताची जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर पाऊल ठेवताना सर्वोत्तम देण्याची आवड ही माझ्यासाठी अनमोल होती. मात्र प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक शेवट असतो आणि म्हणूनच मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेत आहे.”
चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, २० वर्षात त्याने २७८ प्रथम श्रेणी सामने, १३० लिस्ट ए आणि ७१ टी-२० सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीत त्याने ६६ शतकांसह २१३०१ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, लिस्ट ए मध्ये १६ शतकांसह ५७५९ धावा केल्या आहेत. तर टी-२० मध्ये त्याने १ शतकासह १५५६ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने भारतासाठी १०३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. कसोटीमध्ये त्याने १९ शतके ठोकली असून त्यातील सर्वोच्च खेळी नाबाद २०६ धावांची आहे. एकूण ७२०० पेक्षा जास्त धावा करून तो भारतासाठी 'भिंत' म्हणून ओळखला गेला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.