Cheetah Video: कुनो उद्यान सोडून चित्ता 'ओबान' जवळच्या खेड्यात घुसला; नंतर काय घडलं, पाहा Video

वनविभाग या चित्त्याला पुन्हा जंगलात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
Cheetah Video
Cheetah VideoDainik Gomantak

Cheetah Video: कुनो राष्ट्रीय उद्यानातून एक चित्ता जंगल सोडून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या विजयपूरच्या झार बडोदा असलेल्या खेड्यात घुसला आहे. चित्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. खेड्यातील एका स्थानिकांनी याचा व्हिडिओ बनवून तो शेअर केला आहे. दरम्यान, वनविभाग या चित्त्याला पुन्हा जंगलात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांच्या हालचालींवर वनविभागाकडून सातत्याने बारकाईने लक्ष ठेवले जाते. या चित्त्यांपैकीच एक चित्ता ओबान कुनोचे जंगल सोडुन 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या विजापूरच्या झार बरोदा गावात घुसला आहे.

येथील काही स्थानिकांनी त्याचे शुटिंग करून तो व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे तारांच्या कुंपणाने वेढलेल्या एका शेतातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या चित्ता पुनर्स्थापन या प्रकल्पाअंतर्गत भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा भारतात पुनरुज्जीवित करण्यासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका येथून 20 चित्ते आणले होते. सर्वात पहिले नामिबियातून 17 सप्टेंबर रोजी 8 चित्ते आणण्यात आले. त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले. त्यांना देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते.

मध्यंतरीच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांना भारतातील (India) वातावरण मानवणार नाही. ते त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. यावरून काही लोकांनी आक्षेप घेतले होते. चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थिरावून 6 महिन्यांचा काळ लोटला आहे. यामध्ये एका चित्त्याचा किडनी खराब झाल्याने मृत्यू झाला.

त्यानंतर आफ्रिकेतील चित्त्यांना भारताचे वातावण मानवणार नाही. किंवा त्यांना भारतात पुनरुज्जीवित करणे योग्य घातक ठरेल अशा चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर काही काळातच एका मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला. ही मादी आणि तिची पिल्ले सर्व स्वस्थ आहेत. त्यामुळे नकारात्मक चर्चांना ब्रेक लागला आहे.

दक्षिण आफ्रिकन (South Africa) देशांतून भारतात (India) आणलेल्या या चित्त्यांमुळे देशाच्या 'चित्ता प्रकल्प'ला मोठे यश मिळाले आहे. कुनोचे डीएफओ पीके वर्मा यांनी सांगितले की, कुनोचा बाडा क्रमांक चार आणि पाच जोडलेले आहेत. तीन वर्षांची मादी चित्ता सियासा पाच नंबरच्या परिसरात राहत होती. 

त्याच वेळी नर चित्ता फ्रेडी आणि एल्डन बंधूंना चार क्रमांकाच्या एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आले होते. अशी शक्यता आहे की मादी चित्ताने एल्डन किंवा फ्रेडीशी मिलन केले, त्यानंतर या पिल्यांचा जन्म झाला. मादी सियाने 24 मार्च रोजीच या चार बछड्यांना जन्म दिला होता. परंतु कुनो व्यवस्थापनाला बुधवारी म्हणजेच आज याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, वनविभागापर्यंत याची माहिती पोहोचली आहे. त्यांच्याकडून चित्त्याला पुन्हा कुनो जंगलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा चित्ता कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर कसा पडला. चित्त्यांना हे अभयारण्य कमी पडत आहे का? असे प्रश्न उपस्थित राहत असुन पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com