Human Trafficking Racket: सीबीआयने (CBI) मानवी तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने सात राज्यांतील या रॅकेटच्या 10 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान 50 लाख रुपये रोख, संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रिक रेकॉर्ड, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अनेक डेस्कटॉप जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी सुरु आहे.de
तपास यंत्रणेने सांगितले की, आतापर्यंत या लोकांनी 35 जणांना नोकरीच्या बहाण्याने रशिया आणि युक्रेनमध्ये पाठवले असल्याचे तपासात समोर आले आहे. या रॅकेटची मोडस ऑपरेंडी उघड करताना सीबीआयने सांगितले की, हे लोक निरपराध तरुणांना परदेशात आकर्षक नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून त्यांना लक्ष्य करायचे. हे तस्कर एक संघटित नेटवर्क म्हणून काम करत आहेत. विशेष म्हणजे, सोशल मीडिया चॅनेलद्वारे आणि त्यांच्या स्थानिक संपर्क/एजंटद्वारे भारतीय नागरिकांना रशियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत होते.
दरम्यान, या संदर्भात, 06.03.2024 रोजी खाजगी व्हिसा कंसल्टन्सी कंपन्या, एजंट आणि इतरांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, सीबीआयने माहिती दिली. उत्तम रोजगार आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांच्या नावाखाली ते भारतीय नागरिकांची तस्करी करत असल्याचे आढळून आले आहे. या दलालांचे मानवी तस्करीचे जाळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे.
या प्रकरणी सीबीआय दिल्ली, तिरुअनंतपुरम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई येथे जवळपास 13 ठिकाणी एकाचवेळी शोध घेत आहे. आतापर्यंत 50 लाखांहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप, सीसीटीव्ही फुटेज आदी कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड एजन्सीने जप्त केले आहेत. याप्रकरणी अद्याप शोध सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.