Bihar: बेगुसरायनंतर हाजीपूरमध्ये गोळीबार, मध्यवर्ती चौकात घडली घटना

Bihar Crime: बिहारमधील बेगुसराय येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेनंतर हाजीपूरमध्ये गुन्हेगारांनी गोळीबार केला आहे.
 Crime
Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

Bihar: बिहारमधील बेगुसराय येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेनंतर हाजीपूरमध्ये गुन्हेगारांनी गोळीबार केला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करुन गुन्हेगारांनी दहशतीचे वातावरण निर्माण केली आहे. गुन्हेगारांनी शहरात अनेक राऊंड गोळीबार केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय, घटनास्थळावरुन पोलिसांना काडतुसे मिळाली आहेत. हाजीपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील मदई चौकात ही घटना घडली.

दरम्यान, बिहारमध्ये (Bihar) कायद्याचा इक्बाल संपत चालला आहे. बेगुसरायनंतर गुन्हेगारांनी हाजीपूरमध्येही अंदाधुंद गोळीबार केला. दुचाकीवरुन आलेल्या दोन गुन्हेगारांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गोळीबार करुन पळ काढला. सायंकाळी उशिरा गोळीबारामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकच खळबळ उडाली.

 Crime
Bihar च्या माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य, 'बलात्कारासारख्या घटना घडतच...'

दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदई चौकात घडलेल्या या घटनेत पोलिसांना घटनास्थळावरुन दोन रिकामी खोकी मिळाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी नाकाबंदी करुन तपास सुरु केला आहे.

तसेच, हाजीपूर नगर पोलिस स्टेशनचे शैलेंद्र शर्मा यांनी सांगितले की, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. व्यापारी विवेक चौहान यांनी सांगितले की, दुचाकीवरुन आलेल्या गुन्हेगारांनी गोळीबार केला. घटनेनंतर पोलिस पथकाने तपास सुरु केला आहे. पोलिसांना घटनास्थळी काडतुसे मिळाली आहेत. या घटनेनंतर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांनी वाहने अडवून तपासणी सुरु केली आहे.

 Crime
Bihar Crime News : धक्कादायक; पैशांच्या वादातून चुलत भावांनी केली भावाची हत्या

शिवाय, शहरातील मध्यवर्ती भागात ही घटना घडली असून याठिकाणी अनेक मोठी दुकाने आहेत. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. गुन्हेगारांनी कोणालाही लक्ष्य केले नाही. मात्र गोळीबारामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com