''बंगळुरु कन्नड बोलणाऱ्यांचं...'', X वरील व्हायरल पोस्टनं कर्नाटकतील तापलं वातावरण!

Bengaluru News: गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाषा लादणे, उत्तर विरुद्ध दक्षिण वादाशी संबंधित मुद्यावरुन कर्नाटकात अनेकदा ठिणगी पडते.
''बंगळुरु कन्नड बोलणाऱ्या लोकांचं....'', X वरील व्हायरल पोस्टनं कर्नाटकतील तापलं वातावरण!
bengaluru belongs to kannadigas viral x post sparks heated debateDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाषा लादणे, उत्तर विरुद्ध दक्षिण वादाशी संबंधित मुद्यावरुन कर्नाटकात अनेकदा ठिणगी पडते. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या वादावरुन कधीकधी वातावरणही तापवलं जातं.

यातच आता, बंगळूरुमध्ये एका सोशल मीडिया पोस्टची चांगलीच चर्चा रंगलीय. X वरील या पोस्टने बंगळुरुमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्द्याला वादाला खतपाणी घातलयं. पोस्टमध्ये म्हटलयं की, 'बंगळुरु हे कन्नड लोकांचं आहे.' या पोस्टवरुन आता वाद सुरु झालाय. या वादग्रस्त पोस्टमध्ये कन्नड भाषा न बोलणाऱ्या सर्वांना 'बाहेरील' असं संबोधलयं. त्यामुळे लोकांकडून एक्सवर संताप व्यक्त होतोय. सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीचं व्हायरल झालीय. या पोस्टवरुन लोक सोशल मीडियावर दोन गटात विभागले गेलेत. काहीजण या पोस्टच्या समर्थनार्थ आपल्या प्रतिक्रिया देतायेत तर काहीजण या पोस्टवर टीका करताना दिसतायेत.

मंजू नावाच्या यूजरनं म्हटलं की, "बंगळुरुमध्ये येणारे लोक जर कन्नड बोलत नसतील किंवा कन्नड बोलण्याचा प्रयत्नही करत नसतील तर त्यांना बंगळुरुमध्ये बाहेरील असे संबोधले जाईल.''

तर सृष्टी शर्माने लिहिले की, "बंगळुरु भारतात आहे. स्थानिक संस्कृतीचा आदर करणे ही एक गोष्ट आहे, परंतु त्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे ढोंग करणे मान्य नाही."

शिवा नावाच्या आणखी एका युजरने लिहिले की, "स्थानिक भाषांचा आदर करणे महत्त्वाचे आहे, परंतु भाषेच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडणे योग्य नाही. बंगळुरु हे नेहमीच सर्वांना सामावून घेणारे शहर राहिले आहे. ते सर्व स्तरातील लोकांचे स्वागत करते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com