Dungarpur Case: डुंगरपूर प्रकरणात आझम खानला 10 वर्षांची शिक्षा; न्यायालयाने 14 लाखांचा दंडही ठोठावला

Azam Khan: लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना मोठा धक्का बसला आहे.
Azam Khan
Azam KhanDainik Gomantak

Dungarpur Case: लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना मोठा धक्का बसला आहे. एमपी-एमएलए न्यायालयाने डुंगरपूर प्रकरणात आझम खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आझम यांना 14 लाखांचा दंडही ठोठावला आहे. बुधवारी त्यांना या प्रकरणी दोषी घोषित करण्यात आले. डुंगरपूर येथील जमिनीवर कब्जा करुन घरांची तोडफोड केल्याप्रकरणी न्यायालयाने आझम यांना दोषी ठरवले आहे.

आझम खान यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये दोषी आढळले आहेत. आता ते आणखी एका प्रकरणात दोषी आढळले आहेत. आझम यांच्यावर 2019 मध्ये डुंगरपूर कॉलनी जबरदस्तीने खाली केल्याचा आणि लोकांना धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आझम यांच्याशिवाय कंत्राटदार बरकत अलीलाही दोषी ठरवण्यात आले आहे.

कंत्राटदार बरकत अलीलाही शिक्षा सुनावण्यात आली

दरम्यान, एमपी-एमएलए न्यायालयाने कंत्राटदार बरकत अलीला सात वर्षांची शिक्षा आणि सहा लाखांचा दंडही ठोठावला आहे. आझम खान हे सध्या सीतापूर तुरुंगात बंद आहेत. 29 मे रोजी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर झाले होते. वरिष्ठ फिर्यादी अधिकारी शिव प्रकाश पांडे यांनी न्यायालयात सांगितले की, डुंगरपूर बस्ती येथील रहिवासी अबरार याने 6 डिसेंबर 2016 रोजी गंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांनी आझम खान, निवृत्त पोलीस अधिकारी आले हसन आणि कंत्राटदार बरकत अली यांच्यावर घरात घुसून लूटमार आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता.

एमपी-एमएलए न्यायालयाने शिक्षा सुनावली

खान यांचे वकील विनोद शर्मा यांनी सांगितले की, विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने घर जबरदस्तीने खाली करुन ते पाडल्याप्रकरणी माजी मंत्र्याला दोषी ठरवले आहे. दरम्यान, आझम खान यांची पत्नी तंजीन फातिमा यांची बुधवारी रामपूर जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. 24 मे रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात आझम खान आणि त्यांची पत्नी फातिमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांना जामीन मंजूर केला होता. या तिघांनाही रामपूर न्यायालयाने दोषी ठरवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com