Atiq Ahmed Murder Case: अतिक-अश्रफचे दहशतवादी कनेक्शन? दहशतवाद्यांनी मारेकऱ्यांना...

Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमद हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत.
Atiq Ahmed Murder Case
Atiq Ahmed Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमद हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. यातच, आयएसआय आणि लष्कर-ए-तैय्यबाबरोबर असलेल्या संबंधांचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच अतिकवर गोळ्या झाडण्यात आल्या.

त्यानंतर दहशतवादी कनेक्शनचा तपास करणाऱ्या एटीएसने शुक्रवारी अतिक-अश्रफ यांच्या हत्येतील तीन आरोपींची चौकशी केली. अतिक अहमदची हत्या दहशतवादी संघटना किंवा फुटीरतावाद्यांनी केली आहे का, याचा तपास सुरु आहे.

गुप्तचर यंत्रणा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. मारेकऱ्यांचे मोबाईल नंबर घेतले असून त्यांच्या सोशल अकाउंटची छाननी सुरु आहे.

दरम्यान, उमेश पाल हत्येप्रकरणी पोलिसांनी तुरुंगात अतिक अहमद आणि अश्रफ यांचे जबाब नोंदवले होते. अतिक आणि अश्रफ यांनी पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे विदेशी शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याबाबत जबानी दिल्याचा दावा पोलिसांनी (Police) केला.

विशेष म्हणजे, अतिक आणि अश्रफ यांचे पंजाबमधील एका पाकिस्तानीशी संबंध होते. त्याच्या मदतीने शस्त्रांची तस्करी केली जात होती.

15 एप्रिल रोजी एनआयएने धुमनगंज पोलीस ठाण्यात दोघांची चौकशी केली आणि रात्री दोन्ही भावांची हत्या करण्यात आली. सनी, अरुण आणि लवलेश या हल्लेखोरांना घटनास्थळावरुन पकडण्यात आले.

Atiq Ahmed Murder Case
Atiq Ahmed Death Case: अतिक-अश्रफला 'शहीद' संबोधणारे झळकले बॅनर, पोलिसांनी केली मोठी कारवाई

दुसरीकडे, या तीन हल्लेखोरांची एसआयटी चौकशी करत आहे. शुक्रवारी एटीएसचे पथकही चौकशीसाठी पोहोचले. तिघांनाही तासनतास प्रश्न विचारण्यात आले.

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येमागे बाहेरील कोणती संघटना आहे का, याचा शोध घेण्याचा एटीएस प्रयत्न करत आहे.

शेवटी, या शूटर्संना तुर्की पिस्तुले कुठून मिळाली? तिघांनीही हत्या ज्या पद्धतीने केली, त्यावरुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे स्पष्ट होते.

ही तथ्य आहेत

-अतिक आणि अश्रफ यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत, याचा तपास सुरु आहे.

-एटीएस आणि एनआयएच्या पथकाने अतिक आणि अश्रफ यांची चौकशी केली.

-तपास पूर्ण होण्यापूर्वीच अतिक आणि अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

-काही मोठा खुलासा होण्याच्या भीतीने ही हत्या करण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

-तपास पुढे नेत असताना एटीएसने तीन शूटर्संना तासनतास प्रश्न विचारले.

-या शस्त्रास्त्रांची पाकिस्तानमार्गे तस्करी होत असल्याची माहिती गोळा केली.

Atiq Ahmed Murder Case
Atiq Ahmed Murder Case: कुठे आहे आतिकची पत्नी आणि गुड्डू मुस्लिम? यूपी एसटीएफने सांगितला अॅक्शन प्लॅन

पुढारी, माफिया, बिल्डर किंवा शस्त्रास्त्रे तस्कर यांनी हत्या घडवून आणली का?

अतिक अहमदच्या हत्येचा कट रचणारी व्यक्ती कोणीही असू शकते. शूटर्संना सुपारी देऊनही खून केला जाऊ शकतो. अतिक आणि अश्रफशी किती लोकांचे वैर होते माहीत नाही.

अतिक आणि अश्रफ पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर काही मोठे नाव समोर येण्याची भीती होती. अतिकच्या हत्येचा कट रचणाऱ्या व्यक्तीबद्दल त्याने तपास यंत्रणेला काही सांगितले असावे आणि त्याच्यातील दुष्ट लोकांना सुगावा लागला, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

या हत्या प्रकरणात पंजाबचे (Punjab) राजकारणी, माफिया, बिल्डर आणि शस्त्रास्त्र तस्कर यांची भूमिका संशयास्पद आहे. एसआयटी व्यतिरिक्त एटीएस आणि एसटीएफ प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com