Khalistani Group Funds: खलिस्तानी संघटनेकडून पैसे घेतल्याचा केजरीवालांवर आरोप; नायब राज्यपालांकडून NIA चौकशीची मागणी

Khalistani Group Funds: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे नायब राज्यपाल आणि आप सरकारमधील वाद पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे.
Arvind Kejriwal Arrested
Arvind Kejriwal ArrestedDainik Gomantak

Khalistani Group Funds: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे नायब राज्यपाल आणि आप सरकारमधील वाद पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल एलजी व्हीके सक्सेना यांनीही कथित दारु घोटाळ्यातील आरोपांमुळे तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांच्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) तपास करण्याची शिफारस केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, राजभवनाकडे एक तक्रार आली, ज्यामध्ये केजरीवालांवर खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. केजरीवाल यांनी शिख फॉर जस्टिस (SFJ) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेकडून पैसे घेतल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal Arrested
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिलासा मागणं पडलं महागात; HC ने ठोठावला 75 हजारांचा दंड

शिख फॉर जस्टिसकडून राजकीय निधी मिळाल्याचा आरोप

सक्सेना म्हणाले की, ‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने स्थापन केलेल्या शिख फॉर जस्टिसकडून राजकीय निधी मिळवल्याचा आरोप आहे. या आरोपांची सत्यता एनआयएकडून तपासण्यात यावी.’ नायब राज्यपालांनी केंद्रीय गृहसचिवांना लिहिलेल्या पत्रात एका व्हिडिओचा हवाला दिला आहे. या व्हिडिओमध्ये गुरपतवंत सिंह पन्नूने कथितरित्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 16 दशलक्ष डॉलर्सची मोठी रक्कम दिल्याचे सांगण्यात आले आहे.

Arvind Kejriwal Arrested
Delhi Excise Policy Case: ''त्यांना जीवे मारण्याचा रचला जातोय कट''; CM केजरीवाल यांच्याबाबत आतिशी यांचा मोठा दावा

आम आदमी पक्षाने कट रचल्याचा दावा केला

केजरीवाल यांच्याविरोधातील नव्या तपासावर आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा भाजपवर कट रचल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील संभाव्य पराभव पाहून भाजपने नवे षड्यंत्र रचल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. केजरीवाल सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही चौकशीची शिफारस करणारे एलजी व्हीके सक्सेना यांच्यावर टीकास्त्र डागले. भरद्वाज यांनी त्यांना ‘भाजपचे एजंट’ म्हटले. भारद्वाज म्हणाले की, ‘’भाजपच्या इशाऱ्यावर केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक कट रचला गेला आहे. दिल्लीतील सातही जागा गमावत असल्याची धास्ती भाजपने घेतली आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com