Riyan Parag: रियान परागचा व्हिडिओ व्हायरल, प्रायव्हेट डिटेल लीक; अनन्या पांडे आणि सारा अली खानच्या नावाने खळबळ

Riyan Parag Youtube Search: यंदाचा आयपीएल हंगाम अनेक अर्थांनी खास राहिला. संपूर्ण हंगामात फलंदाजांनी आपल्या आक्रमक खेळीने छाप सोडली.
Riyan Parag Youtube Search
Riyan Parag Youtube SearchDainik Gomantak
Published on
Updated on

Riyan Parag Youtube Search: यंदाचा आयपीएल हंगाम अनेक अर्थांनी खास राहिला. संपूर्ण हंगामात फलंदाजांनी आपल्या आक्रमक खेळीने छाप सोडली. विशेष म्हणजे, काही युवा खेळाडूंनीही आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मने जिंकली. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान परागच्या नावाचाही समावेश आहे. मात्र, हंगाम संपल्यानंतर पराग आता त्याच्या कामगिरीमुळे नाही तर वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. वास्तविक, तो त्याच्या YouTube सर्च हिस्ट्रीमुळे चर्चेत आला आहे, ज्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी दिसल्या.

रियान परागची यूट्यूब सर्च हिस्ट्री लीक

राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज रियान परागला यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग करायला आवडते. दरम्यान, त्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रियान स्क्रीनवर यूट्यूब टॅब उघडतो तेव्हा त्याची सर्च हिस्ट्री दिसते. सर्च हिस्ट्रीमध्ये सारा अली खान हॉट आणि अनन्या पांडे हॉट सारखे टॉपिक दिसत आहेत. आता सोशल मीडियावर यावरुन चांगलीच चर्च रंगली आहे. विशेष म्हणजे, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

Riyan Parag Youtube Search
Riyan Parag: रियान परागचा 'जलवा'; बॉल आणि बॅटने चमत्कार करुन ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

रियान परागची आयपीएल 2024 मधील कामगिरी

रियान परागसाठी आयपीएलचा 17वा हंगाम जबरदस्त राहिला. त्याने 16 सामन्यात 52.09 च्या सरासरीने आणि 149.22 च्या स्ट्राईक रेटने 573 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 अर्धशतके झळकावली. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात रियानने महत्त्वाची भूमिका बजावली. तर राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाल्यास, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने लीग टप्प्याच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली. त्या आधारावर त्यांनी प्लेऑफमध्ये धडक मारली. प्लेऑफमध्ये राजस्थानने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दारुण पराभव करुन क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. परंतु दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थानला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

त्याचवेळी, आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद भिडले. रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदाची चव चाखली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com