चालत्या रेल्वेतून ननला उतरवल्या प्रकरणी अमित शहांकडून गंभीर दखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

pinarayi vijayan.jpg
pinarayi vijayan.jpg

हरिद्वारहुन पुरी कडे जाणाऱ्या उत्कल एक्सप्रेसमध्ये घडलेल्या एका घटनेने केरळमध्ये(Kerala) गंभीर पडसाद उमटत असल्याचे दिसून येते आहे. केरळच्या रहिवासी असलेल्या इसाई धर्माच्या चार ननला उत्तरप्रदेशमध्ये धर्मपरिवर्तनासाठी काम करत, असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी झासी रेल्वे स्थानकावर रेल्वेतून खाली उतरवले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या चारही ननची चौकशी करून त्या निर्दोष असल्याचे घोषित केले, तेव्हाच त्यांना पुन्हा रेल्वेत बसता आले होते. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या प्रकरणाचा निषेध करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Amit Shah promises to take action in case of  Christian nuns derailed in Uttar Pradesh)


केरळच्या इसाई धर्माच्या ननवर जबरदस्ती धर्मपरिवर्तन करण्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत, त्यांचा अवमान केल्यामुळे या प्रकरणाचे केरळमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन(Pinarayi Viajayan) यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री विजयन यांनी लिहिलेल्या पत्रात,"अश्या घटना देशाला आणि देशाला आणि देशाच्या धार्मिक सहिष्णुतेला मलीन करण्याचे काम करत असल्याने केंद्र सरकारने अश्या घटनांचा तीव्र निषेध केला पाहिजे. केंद्र सरकार्ला आम्ही विनंती करतो की, या प्रकरणाची दखल घेऊन या घटनेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करावी." असे म्हटले आहे. 

19 मार्च रोजी हरिद्वारहुन पुरी कडे जाणाऱ्या उत्कल एक्सप्रेस मध्ये ही घटना घडली होती. या संबंधितचा एक व्हडिओ सुद्धा समाज माध्यमांवर पसरला होता, ज्या व्हिडीओमध्ये लोकांनी ननला घेरून घेतल्याचे दिसून येते. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी या प्रकरणाची दाखल घेत, या घटनेतील दोषींवर कडक काऐवजी केली जाईल असे आश्वासन दिले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com