Amul Vs Avin Crisis : कर्नाटकनंतर तामिळनाडूतही तापले 'दूध'; वाचा, 'अमूल' आणि 'अवीन'मधील वादाबद्दल सर्वकाही

Milk Crisis: कर्नाटकात अमूल आणि नंदिनी यांच्यातील वाद अगदी निवडणुकीचा मुद्दा बनला होती. आणि आता तामिळनाडूत अमूल आणि अवीन यांच्यात युद्ध सुरू आहे.
Crisis in Tamilnadu Over Milk
Crisis in Tamilnadu Over MilkDainik Gomantak
Published on
Updated on

 MK Stalin On Avin Milk

दोन राज्यांमधील जमीन आणि जलयुद्धाची चर्चा ऐकायला मिळते, पण आता 'दूधा'वरून गदारोळ सुरू आहे. दुधाबाबतचा हा लढा आधी कर्नाटकात आणि आता तामिळनाडूत सुरू झाला आहे.

कर्नाटकात अमूल आणि नंदिनी यांच्यातील वाद अगदी निवडणुकीचा मुद्दा बनला होती. आणि आता तामिळनाडूत अमूल आणि अवीन यांच्यात युद्ध सुरू आहे.

हे प्रकरण इतके वाढले आहे की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, अमूल राज्यात धवलक्रांतीच्या भावनेच्या विरोधात काम करत आहे, ज्यामुळे राज्याच्या सहकारी कंपनी अवीनचे नुकसान होत आहे.

स्टॅलिन शहा यांना काय म्हणाले?

सीएम स्टॅलिन यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, 'आमच्या लक्षात आले आहे की कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (अमूल) ने कृष्णागिरी जिल्ह्यात शीतकरण केंद्र आणि प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आपल्या बहु-राज्य सहकारी परवान्याचा वापर केला आहे.'

'अमूल कृष्णगिरी, धर्मपुरी, वेल्लोर, रानीपेट, तिरुपत्तूर, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याची योजना आखत आहे.' ते म्हणाले, भारतात सहकारी संस्था एकमेकांच्या क्षेत्रात ढवळाढवळ करत नाहीत असा नियम आहे. अशी क्रॉस-प्रोक्योरमेंट धवलक्रांतीच्या भावनेविरुद्ध आहे.

Crisis in Tamilnadu Over Milk
Plane Emergency Door Open: दोनशे प्रवाशांच्या जीवाशी खेळ; तरुणाने अचानक उघडले इमर्जेंसी डोअर

अमूलच्या तुलनेत आविनचे स्थान

आविन ही तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक फेडरेशन लिमिटेडच्या मालकीची राज्य सरकारची सहकारी संस्था आहे.

Aavin कंपनी अनेक दुग्धजन्य पदार्थ बनवते. यामध्ये दूध, लोणी, दही, आईस्क्रीम, तूप, मिल्कशेक, खवा, चहा, कॉफी आणि चॉकलेट या उत्पादनांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, आविन सहकारी अंतर्गत तामिळनाडूच्या ग्रामीण भागात 9,673 सहकारी संस्था कार्यरत आहेत. हे सर्व 4.5 लाख दूध उत्पादकांकडून दररोज 35 लाख लिटर दूध खरेदी करतात.

त्याच वेळी, अमूल सध्या देशातील सर्वात मोठ्या डेअरी ब्रँडपैकी एक आहे. याची स्थापना 1946 मध्ये आनंद, गुजरातमध्ये झाली. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड त्याचे व्यवस्थापन पाहते.

गुजरातमधील 18,600 गावांतील सुमारे 36 लाख दूध उत्पादक त्यासोबत काम करतात. अमूल दररोज 270 लाख लिटर दूध खरेदी करते. अमूलच्या वार्षिक अहवालानुसार, 2022-23 मध्ये कंपनीची उलाढाल 55,055 कोटी रुपये होती.

Crisis in Tamilnadu Over Milk
Video, Professor Asks for Sexual Favour: शाळा-महाविद्यालयेही सुरक्षित नाहीत! प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरिरसुखाची मागणी

कर्नाटकात काय वाद झाला होता?

अमूल आणि नंदिनी यांच्यातील वाद डिसेंबर 2022 मध्ये अमित शहा यांच्या वक्तव्याने सुरू झाला. त्यांनी मंड्यातील सभेत सांगितले की, सहकारी मॉडेलवर आधारित डेअरी कंपन्यांनी अमूल आणि नंदिनी यांनी एकत्र काम केले पाहिजे.

पुढे त्याला राजकीय रंग आला. त्यानंतर अमूलने ट्विट केले की ते बेंगळुरूमध्ये ऑनलाइन वितरण सुरू करणार आहे. यानंतर गोंधळ वाढला. अमूलच्या या प्रस्तावाकडे कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी ब्रँडच्या हद्दीत घुसखोरी म्हणून पाहिले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com