केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिका विषाणूची लागण झाली आहे.
केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिका विषाणूची लागण झाली आहे. Dainik Gomantak

कोरोनानंतर केरळमध्ये आता झिका व्हायरसचा शिरकाव

झिका विषाणू युगांडातील माकडांमध्ये पहिल्यांदा सापडला होता. हा विषाणू एडीज डास चावल्याने होतो असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
Published on

केरळ: देशात कोरोनाची (Covid 19) दुसरी लाट कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोक अद्याप कायम आहे. अशातच आता केरळमध्ये (Kerala) झिका विषाणूने (Zika virus) पाऊल ठेवल्याची बातमी समोर आली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिका विषाणूची लागण झाली आहे. त्यात एका गर्भवती स्त्रीचा देखील समावेश आहे.

तिरुअनंतपुरममधून घेण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत पाठवण्याआले आले. 24 तिरुअनंपुरम मधल्या एका खासगी रुग्णालयात 28 जूनला या गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले आहे. या महिलेला ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे अशा प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत. झिका व्हायरसची लागण झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. या गर्भवती महिलेने 7 जुलैला बाळाला जन्म दिला आहे. ही महिला राज्याच्या बाहेर कोठेही गेलेली नव्हती. या विषाणूची लक्षणे दिसण्यास 3 ते 14 दिवस लागतात. बहुतांश लोकांमध्ये लक्षणे देखील दिसत नाहीत. काही जणांना ताप, शरीरावर चट्टे, डोकेदुखी, मासपेशी आणि सांधेदुखी हे जाणवत आहे.

केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिका विषाणूची लागण झाली आहे.
Health: स्ट्रेस आणि विचारांचं चक्र कस थांबवायचं?

झिका विषाणू युगांडातील माकडांमध्ये पहिल्यांदा सापडला होता. हा विषाणू एडीज डास चावल्याने होतो असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. सायंकाळी या प्रजातीचे डास जास्त प्रमाणात सक्रिय होतात. 1947 ला युगांडात हा विषाणू माकडांमध्ये सापडला. त्यानंतर 1952 ला टांझानियातील लोकांना याची लागण झाली. आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि फॅसिफिक महासागरातील बेटांवर झिकाचे रुग्ण आढळले. कोरोनासारखीच याची लक्षणे आहेत. मात्र हा आजार तितकासा जिवघेणा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. लवकर निदान झाल्यास यावर उपचार घेणे सोपे होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com