Journey: केल्याने देशाटन...

प्रवासात माणसे भेटतात, त्यांच्या अंतरातून जवळीकेची हाक ऐकू येते तर कधी तुमच्या अंतरीच्या हाकेला त्यांच्या ओळखीची साक्ष पटते आणि मैत्रीचा एक आरस्पानी अनुबंध निर्माण होतो.
Journey
JourneyDainik Gomantak

सुमेधा कामत, साहित्यिक

प्रत्येक माणसाच्या मनात कुतूहल असते आणि ते कुतूहल शमवण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो. कुतूहल शमवणे हीच त्याची तळमळ असते आणि त्याच्यात शोधात तो राहतो. ते मिळवल्यानंतर तो समृद्ध होत जातो आणि त्याला मिळालेल्या समृद्धतेचा वाटा इतरांनाही देण्याचा तो प्रयत्न करतो.

शोधाचा, समृद्ध होण्याचा आणि इतरांना तो वाटण्याचा हा प्रवास मुद्दामहून केला जात नसतो तर ते सारे नकळत घडलेले असते.

ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाला कुतुहल शमावण्याची हौस असते तशीच एखाद्या लेखकालाही ती असते. इतरांच्या तुलनेने लेखकाच्या मनात एक प्रचंड ऊर्जा भरलेली असते. या ऊर्जेचे योग्य मार्गाने उन्नयन होणे गरजेचे असते आणि त्यासाठी तो प्रवास करतो.

प्रवास म्हणजे तरी काय? रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे पाहणे, वेगळे अनुभवणे आणि त्यातून समृद्ध होणे. त्याच समृद्ध होण्याच्या अपेक्षेने मी देखील प्रवास करते. प्रवासात मला माझ्या अंतरात्म्याशी सुसंवाद करता येतो आणि काहीतरी पदरात पडल्याचे समाधान मिळते.

Journey
Mahadayi River: म्हादईसाठी मानवी साखळी

प्राचीन काळापासून मानव सतत चालत राहिला आहे- कुठल्यातरी परिसाचा शोध घेण्यासाठी. तो परीस त्याला कधी सापडतो तर कधी सापडत नाही पण त्याच्या कमरेची लोखंडाची साखळी मात्र सोन्याची होऊन गेलेली असते.

प्रवासात माणसे भेटतात, त्यांच्या अंतरातून जवळीकेची हाक ऐकू येते तर कधी तुमच्या अंतरीच्या हाकेला त्यांच्या ओळखीची साक्ष पटते आणि मैत्रीचा एक आरस्पानी अनुबंध निर्माण होतो.

ती निखळ उत्कट मैत्री जपण्याचा, स्वतःचे चांगलेपण इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मग चालू राहतो. प्रवासात मला फार चांगली माणसे भेटली आहेत आणि त्यांचा स्नेह मी मनात कायम जपून ठेवला आहे.

'केलीयाने देशाटन, मनुजा येतसे शहाणपण' हे सुभाषितकारांनी म्हणून ठेवलेच आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com