garbage
garbage Dainik Gomantak

कचरा वेचणाऱ्या महिलांचे आरोग्य महत्वाचे

कचरा वेचणाऱ्या महिलांचे मासिक पाळीतील (Menstruation) आरोग्य (Health) हासुद्धा अतिशय संवेदनशील विषय आहे.
Published on

- तेजश्री कुंभार

कचरा वेचणाऱ्या महिलांचे आरोग्य हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. दिवसभर कचऱ्यात काम करणाऱ्या या महिलांना (Women) गरिबीमुळे शिक्षण घेण्याची संधी मिळालेली नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्यांच्यात जनजागृतीचा अभाव असलेला दिसतो. या महिलांचे मासिक पाळीतील (Menstruation) आरोग्य (Health) हासुद्धा अतिशय संवेदनशील विषय आहे. समाजामध्ये अनेकजण या विषयाबाबत बोलत असतात, काळजी व्यक्त करत असतात. मात्र पुढे येऊन या महिलांना मदत करणारे खूपच कमी असतात. व्यावसायिक असणाऱ्या विशाल मेहता यांनी ‘प्रेमा नारी स्वास्थ्य योजने’ची सुरुवात केली आहे. विशाल यांची आई प्रेमाजी मेहता यांच्या आठवणीप्रित्यर्थ कचरा वेचणाऱ्या, आदिवासी तसेच सॅनिटरी पॅड विकत घेऊ न शकणाऱ्या महिलांना ते पुनर्वापर करता येणारे (रियुझेबल पॅड्स) देतात. 

‘संपूर्ण अर्थ’ आणि ‘गोवा मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा’ या दोन संस्थांच्या 'ट्रान्सफॉर्म' प्रकल्पाच्या मदतीने गोव्यातील (Goa) कचरा वेचणाऱ्या महिला तसेच वेगवेगळ्या स्वच्छता केंद्रावर काम करणाऱ्या महिलांना हे पॅड्स पुरविण्याचे काम सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 200 कचरावेचक महिलांना हे पॅड्स पुरविले जाणार आहेत.

हे पॅड्स वापरण्यासाठी अतिशयक सुलभ आहेत. मध्यप्रदेशमधील आदिवासी महिलांनी एकत्रित येऊन सुरु केलेल्या 'विकल्प एन्टेप्रायझेस' या संस्थेने हे पॅड्स तयार करण्यासाठीची जबाबदारी उचलली आहे. गोव्यातून सुरु झालेली ही मोहीम महाराष्ट्र (Maharashtra) , गुजरात (Gujarat) , मध्यप्रदेश यासारख्या राज्यातसुद्धा आता पोहचली आहे.

garbage
चमत्कार प्रस्थापित करणारा चित्रकार 'रबिन' गोव्यात

देशभरातील महिला निरोगी (Health) राहाव्यात म्हणून आम्ही ही मोहीम सुरू केली आहे. ज्या महिला महिन्याला सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाहीत त्यांची मदत आम्ही ‘रियुझेबल पॅड’ (Reusable Pads) देऊन करीत आहोत. माझ्या आईला समाजसेवेची खूप आवड होती, त्यामुळे आम्ही हा उपक्रम तिच्या आठवणीप्रित्यर्थ सुरू केला आहे.

- विशाल मेहता, व्यावसायिक आणि समाजसेवक

सध्या आम्ही 55 कचरा वेचक महिलांना (Women) या पॅड्सचे वितरण केले आहे. पॅड्सचे वितरण करताना पॅड्स धुण्याबाबत घ्यायची काळजी, मासिक पाळीतील स्वच्छतेची गरज आणि पॅड्सचा वापर कसा करायचा याबाबतसुद्धा जनजागृती करतो.

- लक्षांती बांदेकर, मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com