
दरवर्षी, 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत हजारो भाविक आणि पर्यटक (Tourist) जुन्या गोव्याला (Old Goa) भेट देतात, जेव्हा सेंट फ्रान्सिस झेवियरच्या प्रर्थनासभेचे आयोजन केले जाते आणि त्यानंतर फेस्ताला (Fest) सुरुवात होते.
16 व्या आणि 17 व्या शतकात हे शहर जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक होते. चर्चने भरलेले, ते 'रोम ऑफ द ओरिएंट' म्हणून ओळखले जात असे- शहराची मांडणी आणि तिथल्या सौंदर्यामुळे! अशी म्हणच होती, "Quem viu Goa, nao tem de ver Lisboa" अर्थात "तुम्ही गोवा (Goa) पाहिला असेल तर तुम्हाला लिस्बोआ (Lisboa) पाहण्याची गरज नाही.” लिस्बोआ ही पोर्तुगालची (Portugal) राजधानी आहे.
बेसिलिकाचे बांधकाम 1594 मध्ये सुरू झाले आणि 1605 मध्ये पूर्ण झाले. चर्चचा (Church) एक दर्शनी भाग भव्य ग्रॅनाइटने सुशोभित आहे. चर्चच्या मुख्य सभागृहाचा भाग एक प्रशस्त आयताकृती आहे. चर्चच्या (Church) भागात दोन चॅपल आहेत - उत्तरेकडील चॅपल पवित्र विधींसाठी समर्पित आहे, तर दक्षिणेकडील चॅपलमध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हियरची संगमरवरी समाधी आहे. मुख्य वेदी पवित्र ट्रिनिटीच्या चिन्हासह बाळ येशूला समर्पित आहे, त्यावरूनच चर्चला ‘बॉम जिजस’ (Bom Jesus) हे नाव प्राप्त झाले आहे.
वेदीच्या मध्यभागी सेंट इग्नेशियस ऑफ लॉयोलाचा एक मोठा पुतळा उभा आहे, जो सोसायटी ऑफ जीझसचा संस्थापक आहे. त्याचा उजवा हात एखाद्या सेनापतीने आपल्या सैनिकांना (Soldier) पुढे जाण्याचा आदेश दिल्यासारखा उंचावला आहे, परंतु त्याच वेळी त्याने स्वर्गाकडे निर्देश केला आहे. असे म्हटले जाते की संताची हीच वृत्ती होती जेव्हा ते उद्गारले, "क्वाम सॉर्डेट मिही टेलस क्वम कोएलम एस्पिसियो!" ('मी जेव्हा स्वर्गाकडे डोळे टेकवतो तेव्हा पृथ्वी कसा माझा तिरस्कार करेल?)
बरीच वर्षे, नव्या पोर्तुगीज (Portugal) गव्हर्नर आणि व्हाइसरॉय यांनी बॉम जीझस येथे बिशपच्या हस्ते माजी गव्हर्नरकडून गोव्याची सूत्रे स्वीकारणाऱ्या समारंभाचे आयोजन करण्याच्या प्रथेचे पालन केले. बॅसिलिका ऑफ बॉम जिझसला जोडून प्रोफेस्ड हाऊस आहे. ख्यातनाम प्राच्यविद्येचा अभ्यासक, अँक्वेटील डु पेरॉन, यांनी आपल्या ‘डिस्कोर्स प्रिलिमिनेअर ऑउ इंट्रोडक्शन ऑउ झेंड अवेस्ता’ मध्ये याचे वर्णन केले आहे: "मी जेसुइट्सच्या या निवासाचे कौतुक शब्दात करू शकत नाही, एक भव्य इमारत, जी युरोपमध्ये सर्वात सुंदर धार्मिक निवासांपैकी एक म्हणून ओळखली गेली असती."
गोव्यातून (Goa) जेसुइट्सच्या हकालपट्टीनंतर, 1759 मध्ये, हे सदन आर्चबिशपच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि नंतर काही काळ क्लर्जींच्या शिकवणीसाठी स्थापन केलेल्या एका सेमिनरीने ते ताब्यात घेतले. सेंट फ्रान्सिस झेवियरचे (St Francis Xavier) शरीर बॅसिलिकातील चांदीच्या थडग्यात ठेवलेले आहे. संगमरवरी पेडेस्टलवर स्थापित केलेल्या, समाधीचे दोन वेगळे भाग आहेत. पोप पायस बारावे यांनी वर्णन केल्यानुसार समाधी "सर्वात चमकदार फ्लोरेंटाईन कलेमधील कामाचा एक परिपूर्ण नमुना" आहे, तर शवपेटी 1636 आणि 1637 च्या दरम्यान गोव्यातीलच (Goa) एका सोनाराने बनवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.