गंधाचे गारूड

गंधाचे अनेक प्रकार आहेत. फुलांचा वास, लाकडाचा वास, चामड्याचा वास, समुद्राचा वास, जळल्याचा वास, मत्स्यगंध, मृद््गंध, सायप्रसचा वास, फर्नचा वास, वॅनिला, स्ट्राॅबेरी, काॅफी, चाॅकलेट यांचा वास.
On the Scent  writer Paola Totaro and Robert Wainwright
On the Scent writer Paola Totaro and Robert WainwrightDainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

गोड, खारट, आंबट, कडू आणि युनामी हे पाचच चवीचे प्रकार आहेत. त्या तुलनेने वासाचे दहा हजार प्रकार आहेत. आपल्याला गंध संवेदना देणारे आपले घाणेंद्रिय हे महत्वाचे इंद्रिय आहे याची जाणीव आपल्याला गंध - संवेदना गमावल्यावर येते. वृद्धापकाळी गंध - संवेदना कमी होणे किंवा गमावणे हे स्मृतीभ्रंशाचे लक्षण आहे.

आपण दर दिवशी 23040 वेळा श्वास उच्छवास सोडत असतो. आपण सुमारे 438 क्युबीक फूट हवेचे श्वसन करतो. आपल्या नाकात गंध संवेदना टिपणाऱ्या सुमारे 50 लाख पेशी असतात. गंधाची संवेदना उत्क्रांतीच्या काळात महत्वाची संवेदना होती.

प्राणी अन्नपदार्थ हुंगून ते विषारी किंवा खाण्यायोगे आहेत की नाही हे ठरवत असत. श्वापदे आपल्या भक्ष्याचा वास हुंगत असत. दुबळे प्राणी आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहुल आक्रमक श्वापदांच्या वासावरून ओळखत. त्यामुळे we think because we smell असे म्हटले जाते.

On the Scent  writer Paola Totaro and Robert Wainwright
Goa's Three Controversy: शांतादुर्गा, कोकण रेल्वे, फार्मा नोकरभरती; आठवडा गाजवणाऱ्या गोव्यातील तीन घटना

प्रत्येक गंधात आपली जुनी आठवण गोठलेली असते. Smell is a condensed memory. स्पर्श, दृष्टी, श्रवण, चव ह्यापेक्षा गंधाची आठवण आपल्याला शंभर पटीने अधिक होते. आपल्या 75 टक्के भावनांचा उगम गंधामुळे होतो. खाद्यपदार्थांची चव समजण्यात गंधाचा वाटा 80 टक्के असतो. तेल, तूप, कापूर, उदबत्ती, फुले, निर्माल्य, फळे, नैवेद्य, नारळ ह्यांचा सामूहिक गंध आपल्याला लहानपणात जुन्या देवखोलीत घेऊन जातो. फटाक्यांचा आवाज आपली सणाउत्सवांची स्मृती जागवतो. गंधाची स्मृतीरंजकता (nostalgia) अप्रूप आहे. नवजात अर्भकाला विशिष्ट वास येतो. लहान मुलाला सतत आईचा वास (mothor odor) हवा असतो. प्रियकराला प्रेयसीचा शरीरगंध आकर्षित करतो. फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट युद्धावर गेला असताना त्याने आपली प्रेयसी - जोसेलिना हिला पत्र लिहून कळवले, "मी आठ दिवसांत युद्धावरून परतणार आहे. ह्या आठ दिवसात स्नान करू नकोस म्हणजे तुझ्या सेंद्रिय शरीरगंधासह मला तुला उपभोगता येईल."

गंध ही स्पर्श, चव, श्रवण व दृष्टी यापेक्षा तीव्र, तरल संवेदना आहे. गंध संवेदनेत आपली चिंता दूर करण्याची, आपल्या भावना तरल करण्याची व आपला मूड सुधारण्याची शक्ती असते. हे गंधाने भारलेले ( sense luscious) जग आहे. ईजिप्तच्या संस्कृतीस व पुढे इस्लामला सुगंधाचे आकर्षण होते. ईजिप्तचे राजे अत्तराचा वापर करत. क्लिओपात्रा व अलेक्झांडरलाही अत्तर आवडे. महंमद पैगंबर अत्तराचा शौकीन होता.

गुलाबाचे पाणी मुसलमान खाद्यसंस्कृतीत सरबत, मिठाई करण्यासाठी वापरतात. अत्तराला 17000 वर्षाचा इतिहास आहे. 8000 जास्मीनची फुले कुस्करून 1 मिलीलीटर अत्तर तयार होते.100 किलो गुलाबाच्या पाकळ्यातून 25 मिलीलीटर अत्तर निर्माण होते. यामुळे अत्तर महाग असते. गुसी, चॅनेल नंबर 5, ख्रिश्चन डिओर, माॅन्त ब्लान्क, केल्वीन क्लेन हे जगप्रसिद्ध महाग अत्तराचे ब्रॅन्डस् आहेत. जगातील अत्तराचा उद्योग 50 बिलीयन डाॅलर्सचा आहे. भारतात कनोज शहर ही अत्तराची राजधानी मानले जाते. जगात फ्रान्स हा अत्तराचा सगळ्यात शौकीन देश आहे.

पर्शियन डाॅक्टर इब्न सिना ह्याने अत्तराचा शोध लावला व सेंद्रिय रसायनशास्त्राच्या प्रगतीला चालना दिली. सुफी दर्ग्यात जास्मीन, केवडा व गुलाब यांचे संमिश्र मजमुआ हे अत्तर शिंपडले जाते. मक्केतील काबावरही उंची अत्तर शिंपडून सर्व माहोल सुवासिक करतात.

गंधाचे अनेक प्रकार आहेत. फुलांचा वास, लाकडाचा वास, चामड्याचा वास, समुद्राचा वास, जळल्याचा वास, मत्स्यगंध, मृद््गंध, सायप्रसचा वास, फर्नचा वास, वॅनिला, स्ट्राॅबेरी, काॅफी, चाॅकलेट यांचा वास. आंधळ्याचे घाणेंद्रिय तीव्र असते. वासावरून त्यांना वस्तुंची व माणसांची ओळख होते. सर्व प्राण्यांत कुत्र्याचे घाणेंद्रिय तरल असल्याने पोलीस शोधकार्यात कुत्र्यांची मदत घेतात.

न्यूयाॅर्कमधल्या हर्बीस ह्या चाॅकलेटच्या दुकानात चाॅकलेटच्या गंधाचा स्प्रे मारल्यावर चाॅकलेटची विक्री 35 टक्क्यानी वाढल्याचे आढळले आहे. हार्ड राॅक कॅफे आपल्या रेस्टाॅरंटमध्ये कुकी व वेफल्सचा स्प्रे मारतात. काही रेस्टाॅरंटस् पिझाच्या गंधाचा स्प्रे व ग्रीलचा स्प्रे वापरतात.

ब्रिटीश एअरवेज ही आपल्या विमानात ताज्या गवताचा व समुद्राचा गंध शिंपडते. मेकेन्सच्या दुकानात उकडलेल्या बटाट्याचा स्प्रे मारून ग्राहकांना आकर्षित केले जाते. एका जपानी कंपनीला आपल्या आस्थापनात लव्हेंडरचा स्प्रे मारल्यास कर्मचारी 20 टक्के कमी चुका करतात, जास्मीनचा स्प्रे मारल्यास 33 टक्के व लिंबाचा स्प्रे मारल्यास 54 टक्के कमी चुका करतात असे आढळून आले आहे.

लेमन, सायप्रस, स्पायसेस ह्यांच्या गंधामुळे आपल्याला मनमोकळे वाटते. आॅरेंज व अन्य फळांच्या गंधामुळे आणि मस्क, अंबरच्या गंधामुळे आपल्याला ती गोष्ट विश्वासार्ह वाटते.पेन्टस कंपन्या सुगंधित रंगाची विक्री करतात. सुगंधी ग्रीटींग कार्डस अधिक खपतात. गंधाच्या शोधयात्रेला Scentsploration असे म्हणतात.

भुताना आणि देवदूताना गंधाची समज नसते असे मानले गेले आहे. गंध ही केवळ मानवाला, प्राण्यांना, पक्ष्यांना मिळालेली ह्या ''लोभस इहलोका''ची देणगी आहे. किटकांना गंध ही एकच भाषा समजते. फुलपाखरे गंधाच्या समुद्रात आकंठ बुडलेली असतात.

तपकीर ओढणे, शिंकणे हे शारीर आनंद देणारे प्रकार आहेत. आयुर्वेदाच्या अभ्यंगस्नानात वासाचा उपयोग केलेला असतो. ख्रिश्चन धर्म गंधाला, सुगंधाला विरोध करतो. कुराणात मात्र गंधाची तारीफ केलेली दिसून येते. बौद्ध, हिंदू धर्मात गंधाला, सुगंधाला खास स्थान आहे.

''पोर्तुगाल'' वरच्या माझ्या प्रवासवर्णनाचा शेवट असा होतो. "आता कधी तिन्हीसांजेला मी वोल्तेरावर बसून पोर्तोहून आलेल्या रेड वाईनचे घुटके घेतो, तेव्हा माझ्या नाकासमोर सगळे वास दरवळतात. पोर्तोच्या वायनरीमधला नुकत्याच काढलेल्या द्राक्ष्यांचा मंद सुवास, रेस्टारंट स्क्वेअरमध्ये खाल्लेल्या रोस्टेड सामनचा उग्र गंध, रुआ आगुस्ताच्या बुटांच्या दुकानांतील चामड्याचा वास, आर्त स्वरात फादो गाणाऱ्या गायिकेच्या अत्तराची घमघम, अल्फामाच्या डोंगरावरील इगर्जीत पाद्रींनी केलल्या धुपारतीतील धुंगराचा वास आणि अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या झुळकीचा अनाघ्रात वास...हे सगळे वास!

पोर्तुगाल हे असे विविध वासांनी धबधबलेले पोळे आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com