'प्रेम कहाण्यांना साथ करणारे बकुळ फुल'

कवी साहित्यिक आणि प्रेमिकांचा सर्वात आवडता वृक्ष म्हणजे बकुळ
बकुळ
बकुळDainik Gomantak
Published on
Updated on

कवी साहित्यिक आणि प्रेमिकांचा सर्वात आवडता वृक्ष म्हणजे बकुळ. बकुळाच्या फुलांवरून अनेक भावगीते रचली गेली आहेत ती त्यांच्या सुवासिक मादकतेमुळेच. फुले अगदी वाळून गेली तरीसुद्धा त्याचा सुवास मागे दरवळत राहतो. सध्याच्या वसंतऋतुमध्ये सार्या भवतालात दरवळत, आपल्या अस्तित्वाची दखल दुसऱ्यांना घ्यायलाच लावणारा वृक्ष म्हणजे बकुळ. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ (इंडेमिक) असलेला हा वृक्ष उत्तरेतही सर्वत्र पसरला आहे तो त्याच्या बहुगुणी औषधी गुण वैशिष्ट्यामुळेच. प्रामुख्याने बकुळ दाक्षिणात्य असला तरी तो आता देशातल्या आणि परदेशातील बहुतांशी उद्यानांमध्ये दिसतो.

बकुळ
चैत्राच्या उन्हात मादक सुगंध दरवळत आला सुरंगीचा बहाव...

सदाहरित स्वरूपाचा, मध्यम आकाराचा बकुळीचा डेरेदार वृक्ष आंब्यासारखा चाळीस पन्नास फूट सहज वाढतो. साल काळपट, तपकिरी, खडबडीत, भेगाळलेली असते. पाने लंबगोल चकचकीत गच्च असतात त्यामुळेच या झाडाखालची सावलीही थंडगार असते. याच पानामागे कळ्या लपून असतात. मात्र त्या फुलल्या की त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यावीच लागते.

फुले, पांढरी पिवळसर, छोटीशी, दोन सेंटीमीटर व्यासाची, सुट्टी, गुच्छ करून येतात. पाकळ्यांची रचना गोलाकार तर फुले चक्राकार असतात. गळून पडलेली फुले वाळल्यावर तपकिरी बदामी होतात. ती वाळतात पण कुजत नाहीत. त्यांचा सुगंधही बरेच दिवस टिकून असतो. बकुळाचे वनस्पती शास्त्रीय नाव ‘मायमुसॉप्स एलेंगी’ असून फॅमिली सॅपोटसी आहे. इंग्रजीत याला इंडियन मेडलर असे म्हणतात. याचे औषधी गुणधर्मही खूप आहेत. आयुर्वेदातही त्यांचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. सध्या बकुळ बहरात आहे. त्याच्या वळेसार- वेण्या गोव्यात बऱ्याच ठिकाणी मिळतात. त्या आवर्जून विकत घ्या आणि फुलांचा सुगंधही!

- अनिल पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com