गोवा मुक्तिलढ्यासाठी दीदींचे महत्वपूर्ण योगदान

जन्मभूमीशी ऋणानुबंध : गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची भुरळ; संगीतप्रेमींकडून जुन्या आठवणींना उजाळा
Lata Mangeshkar
Lata MangeshkarDainik Gomantak

पणजी: लता मंगेशकर यांनी 50 च्या दशकात गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी निधी उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. लतादीदी त्यावेळी लोकप्रियतेची शिखरावर होत्या. सुधीर फडके यांनी लतादीदींना विनंती करून गोव्यासाठी गायनाचा कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम पुण्यात जरी झाला असला तरी या कार्यक्रमातून मिळालेला निधी हा गोव्याच्या मुक्तिलढ्यासाठी उपयोगी ठरला. त्यामुळे दीदींचे हे योगदान न विसरण्यासारखे आहे.(lata mangeshkar important contribution for liberation of Goa)

Lata Mangeshkar
‘आप’व्यतिरिक्त इतरांना दिलेले मत भाजपलाच: सिसोदिया

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होणे साहजिकच. ‘गुगल सर्च इंजिन’वरही लता मंगेशकर यांचा नावाचाच शोध घेतला जातोय. मूलत: मंगेशकर या आडनावाचा गोव्याशी फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे लतादीदींच्या जाण्याने गोमंतकीयांना मोठा धक्का बसला आहे. लतादीदींचे पिता दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध मराठी आणि कोकणी संगीतकार, नाट्यसंगीतकार होते. त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये गोव्यातील मंगेशी या छोट्या गावात झाला. सध्या मंगेशी हे गोव्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दीनानाथ मंगेशकर यांचे पिता गणेश भट्ट नावते हर्डीकर हे मंदिरात अभिषेक करायचे. त्यामुळे ‘अभिषेकी’ या उपनावानेही त्यांना काही काळ ओळखले गेले. मात्र, दीनानाथ यांनी या दोन्ही नावांचा स्वीकार केला नाही. मंगेशी या गावात जन्मल्याने त्यांनी आपले आडनाव ‘मंगेशकर’ असे ठेवले.

असा आहे मंदिराचा इतिहास

गोव्यातील मंगेशी (Mangeshi) येथील मंगेशाचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. जगभरातील भाविक गोव्यात आल्यानंतर या मंदिराला भेट देतात. येथे शिवाची पूजा-अर्चा केली जाते. गोव्यातील श्रीमंत आणि हिंदूंचे सर्वांत मोठे मंदिर म्हणूनही मंगेशाच्या मंदिराचा उल्लेख होतो. या मंदिराची आख्यायिका आहे. भगवान शिवाने पत्नी देवी पार्वतीला घाबरविण्यासाठी स्वत: वाघाचे रूप धारण केले. वाघाला पार्वतीने पाहिले, तेव्ही ती घाबरली. तेव्हा भगवान शिवाचा शोध घेण्यासाठी ती ‘त्राहिमाम गिरीशा’ असे म्हणत सुटली. काही काळानंतर मुंगिरिशापासून ते मंगेशापर्यंत ती उच्चारत गेली. त्यावरून ‘मंगेशी’ हे नाव पडले.

मुड्डोशी, बांगडे आवडते मासे

गोव्यातील (Goa) मंदिरे, येथील खाद्यसंस्कृती याची दीदींना नेहमीच ओढ होती. गोमंतकीय मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रेम होते. गोमंतकीय साहित्य आणि साहित्यिकांबद्दलही त्यांना ममत्व होते. गोमंतकीय खाद्यपदार्थांमध्ये मासे हे त्यांचे प्रिय खाद्यान्न. येथील माशांची नावे त्यांना तोंडपाठ होती. मुड्डोशी व बांगडे हे त्यांचे आवडते मासे. त्या दरवर्षी कुटुंबासह मंगेशी मंदिराला भेट देत. वडिलांच्या संगीताची सुरुवात इथूनच झाली होती. त्या काळात रंगमंचीय संगीत कार्यक्रमात संगीतसाथ गोव्यातील कलाकार देत असत. त्यामुळे त्या कलाकारांशीही त्यांचा जिव्हाळा होता.

सचिन कोरडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com