वेंर्गुल्यातील डचांची वखार

ह्या इमारती म्हणजेच वखारी. ब्रिटिशांनी कलकत्ता,सुरत, मद्रास, मुंबई वगैरे ठिकाणी वखारी बांधल्या.
Dutch accent
Dutch accentDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील व्यापारावर वर्चस्व मिळवण्यासाठी अरबी समुद्रात गोव्याच्या पोर्तुगीज मुख्यालयाजवळ पोर्तुगीजांशी कडवी लढाई केली.

युरोपीय व्यापाऱ्यांचे सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात आगमन झाले. त्यांनी आपला खरेदी विक्री केलेला माल सुरक्षित साठविण्यासाठी इमारती बांधल्या. ह्या इमारती म्हणजेच वखारी. ब्रिटिशांनी कलकत्ता,सुरत, मद्रास, मुंबई वगैरे ठिकाणी वखारी बांधल्या.

डचांनी इ.स.१६०२ मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीमार्फत व्यापार वाढवून पहिली बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून लौकिक मिळविला.डचांनीही व्यापारी साठवणूक व संरक्षणासाठी भारतात वखारींची बांधणी केली. इ.स.१५६७ मध्ये डचांनी वेंगुर्ल्यात एक किल्ला बांधला.

पहिली वखार त्यांनी इ.स.१६०५ मध्ये मच्छलीपट्टन येथे बांधली. त्यानंतर त्यांनी सुरत, चिनसुरा, कासिमबझार, पाटण,नेगापटम, कोचीन इत्यादी ठिकाणी वखारी बांधल्या.डच भारतात व्यापारी उद्देशाने आले होते त्यामुळे त्यांनी राजकीय कारणांसाठी वखारींचा उपयोग केला नाही

डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील व्यापारावर वर्चस्व मिळवण्यासाठी अरबी समुद्रात गोव्याच्या पोर्तुगीज मुख्यालयाजवळ पोर्तुगीजांशी कडवी लढाई केली. १६३६ मध्ये जेव्हा अँटोनियो व्हॅन डायमेनची डच ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर-जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा त्यांनी गोव्याच्या उपसागराजवळ - भारतातील पोर्तुगीज मुख्यालयाजवळ - त्यांच्या व्यापाऱ्यांना बाहेर पडणे अशक्य करण्यासाठी वार्षिक नाकेबंदी लागू केली.

२५ जुलै १६३९ रोजी डच ईस्ट कंपनीचे ॲडमिरल कॉर्नेलिस सिमोन्स व्हॅन डर वीर यांच्या नेतृत्वाखाली सात जहाजांचा एक स्क्वॉड्रन बटाव्हिया येथून निघाला, झुवारी नदीच्या मुखाशी किल्ले मुरमुगावच्या उपसागरात तीन नि:शस्त्र गॅलियन असल्याचीही अफवापण पसरली होती.डच ईस्ट इंडिया कंपनीचे ॲडमिरल व्हॅन डर वीरने ३० सप्टेंबर रोजी झालेल्या अचानक हल्ल्यात त्यांना पकडण्याचा किंवा नष्ट करण्याचा निर्णय घेतला.

डच आर्काइव्हजमध्ये जतन केलेल्या अॅडमिरलच्या फ्लॅगशिपच्या जर्नलमधून आम्हाला या मोहिमेबद्दल माहिती मिळते, एक अहवाल पोर्तुगीज बाजूने व दुसरा डच अहवाल जो १६४० मध्ये प्रकाशित झाला होता आणि त्याच वर्षी इंग्रजीमध्ये अनुवादित देखील झाला होता आपल्याला पाहायला मिळतो.

डच अहवालात असे म्हटले आहे की डच ईस्ट इंडिया कंपनीचे ऍडमिरल व्हॅन डर वीरने डच सैनिकांना रोइंग बोटीतुन जाउन पोर्तुगीज गॅलियनच्या डेकवर चढण्यासाठी आज्ञा दिली होती. तीन पोर्तुगीज गॅलियन साओ बोव्हेंटुरा जो मध्यभागी होता, सशस्त्र परंतु जहाजावर युद्धासाठी तयार नसलेले,

गॅलियन बॉम जीझस आणि गॅलियन साओ सेबॅस्टिओ यांच्या बाजूने , खाडीत निशस्त्र होते अशी तीन नावे डच अहवालात सापडतात. या दोन निशस्त्र गॅलियनमधील तोफा समुद्रकिनाऱ्यावर पडून असल्याचे विधान पोर्तुगीज फायलींमध्ये सापडते.

त्याच दरम्यान डचांनी इसवी सन १६३७ मध्ये विजापूरच्या सुलतानांकडून परवानगी घेऊन वेंगुर्ला येथे वखार बांधली. वखारीचा कारभार त्याकाळी थेट जकार्तामधून होई. सुरुवातीला इमारतीचा वापर मलबारच्या दिशेने जाणाऱ्या बोटींना मध्यवर्ती थांबा म्हणून केला जात होता आणि नंतर स्थानिक वस्तू, पदार्थ, उत्पादने यांचा व्यापार केला जाऊ लागला.

ह्या इमारतीचे स्थापत्य युरोपीय पद्धतीचे आहे. डचांची निशाणी असलेल्या ह्या वखारीला इ.स.१९७४ पासून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. तिची देखभाल व दुरुस्ती दुर्लक्षित आहे.

वखारीचे बांधकाम इ.स.१६३७ ते १६५५ पर्यंत चालले. किल्ल्यासारखे बुरूज असलेली ह्या वखारीच्या बांधकामाला त्याकाळी तीन हजार गिल्डर्स (नेदरलॅंडचे चलन) खर्च आला होता. त्याकाळात वखारीमध्ये मर्यादित तोफखाना होता.

वखारीच्या सभोवताली कोरडा खंदक असून त्यावरून रहदारी करण्यासाठी अस्थायी साकव होता. सभोवताली कुंपणाच्या आत कोठार, निवासी सदनिका, छोटासा दवाखाना इत्यादींचा समावेश होता. प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला लहान बाग आणि एक विहीर होती. डाव्या बाजूला माळी व नोकरांची घरे होती.

वखारीची मुख्य इमारत उत्तर दक्षिण पसरलेली आयताकार आहे. पूर्वेला एक सामायिक व्हरांडा आहे. पूर्वेकडील दर्शनी भाग तीन कमानींमध्ये दोन खांबांवर विभागण्यात आला आहे. पश्चिमेकडे टी आकारात पायऱ्या आहेत आणि खाली छोटा खोलीवजा दवाखाना होता. सेवेकऱ्यांसाठी राहण्याची जागा होती.

तळमजल्यावर राहण्यासाठी सोय असावी.आतील भागात नक्षीदार गिलावा होता.वर भिंतीवर दिसणाऱ्या खोबण्यांवरून तिथे पोटमाळा असावा.पहिल्या मजल्यावरील खिडक्यांमधून सभोवतालचा परिसर दिसतो.

इथून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जिना आहे. इसवी सन १६८३ मध्ये औरंगजेबाच्या फौजांनी वेंगुर्ला शहरात हल्ला केला होता तेव्हा औरंगजेबाचा मुलगा अकबर ह्याने ह्या वखारीत आश्रय घेतला होता. इ.स.१७६६ च्या सुमारास वाडीकर सावंतांचा वेंगुर्ल्यावर अंमल झाला. नंतर ब्रिटिशांची सत्ता आली.

इ.स.१८६२ नंतर वखार विनावापर राहिली आणि इथल्या इमारतीचे लाकडी भाग आणि इतर वस्तू चोरीला गेल्या. डचांची कोकण किनारपट्टीवर असलेली, जीर्ण होत चाललेली व डचांचा इतिहास सांगणारी ही एकमेव वास्तू आहे. ही वखार कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात, वेंगुर्ला बाजार बसथांब्याकडून पुढे बंदराकडे जाताना डाव्या बाजूला असणाऱ्या एका गल्लीत शेवटी पूर्णपणे जीर्ण स्थितीत आहे.

Dutch accent
Goa Fuel Issue:...तर इंधन गळती टळली असती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com