World Breastfeeding Week: अमृतपान...बाळांसाठी निसर्गाचे परिपूर्ण अन्न

मूल जन्मल्याबरोबर एका तासाच्या आत स्तनपान दिल्यामुळे व आईच्या स्पर्शामुळे नवजात बालकांचे तापमान, हृदयाची गती, श्वास घेणे नियंत्रित होते
World Breastfeeding Week
World Breastfeeding WeekDainik Gomantak
Published on
Updated on

वर्षा नाईक

World Breastfeeding Week जगभरातील पालक त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण, चांगल्या साधनसुविधा पौष्टिक अन्न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्याचबरोबर काही कुटुंबांसाठी दोन वेळचे पोट भरणेही शक्य नसते. हातावर पोट असणारी महिला आपल्या नवजात अर्भकाला स्तनपानही व्यवस्थित व नियमित करवू शकत नाही.

कारण तिला रोजंदारीवर, तासाभराच्या कामासाठी कारखान्यात नोकरीवर परत जावे लागते. अनेक लहान मुलेही कुपोषित राहतात. कारण निरोगी वाढ आणि विकासासाठी आवश्यक असलेले प्रथिनयुक्त पदार्थ, स्थानिक पातळीवर उपलब्ध नाहीत किंवा ते परवडत नाहीत.

मूल जन्माला आल्याच्या पहिल्या तासापासून ते मूल मोठे होईपर्यंत त्याला मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे पोषक आहार मिळतो की नाही याची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.

स्तनपान हे अमृतपान आहे व त्यामुळे जीव वाचतो हे माहीत असूनही, सर्व नवजात अर्भकांपैकी निम्म्याहून कमी अर्भकांना आयुष्याच्या पहिल्या तासात स्तनपान दिले जाते आणि पाचपैकी फक्त दोन अर्भकांना आयुष्याच्या पहिल्या ६ महिन्यांत केवळ स्तनपान दिले जाते.

जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले पोषण खूप महत्त्वाचे आहे हे प्रत्येक मातेच्या मनावर ठसले पाहिजे. ही केवळ मातापित्याचीच नव्हे तर प्रत्येक कुटुंबाची, समुदायाची, गावाची, समाजाची, देशाची आणि आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

मूल जन्मल्याबरोबर एका तासाच्या आत स्तनपान दिल्यामुळे व आईच्या स्पर्शामुळे नवजात बालकांचे तापमान, हृदयाची गती, श्वास घेणे नियंत्रित होते. हे पहिले स्तनपान अर्भकाच्या आयुष्यातील सर्वांत असुरक्षित काळात त्याचे मृत्यूपासून संरक्षण करते.

तथापि, सर्व नवजात अर्भकांपैकी निम्म्याहून कमी अर्भकांना जन्मलेल्याच्या पहिल्या तासात स्तनपान दिले जाते, त्यामुळे गर्भाच्या बाहेर त्यांच्या आईशी पहिला संपर्क उशिरा येतो.

सिझेरियन सेक्शनद्वारे प्रसूती झालेल्या बहुतेक नवजात मुलांमध्येही योग्य पद्धतीने लवकर स्तनपान सुरू केले जाऊ शकते. जितका जास्त विलंब होईल तितका मृत्यूचा धोकाही वाढतो.

आईचे दूध हे बाळांसाठी निसर्गाचे परिपूर्ण अन्न आहे; परंतु स्तनपानाची क्रिया नेहमीच नैसर्गिकपणे होत नाही. स्तनपान यशस्वी होण्यासाठी महिलांना घरच्यांचे पाठबळ आणि वैद्यकीय मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. पाठबळ महिलांना सक्षम बनवते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवते, ज्यायोगे नैसर्गिक प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते.

स्तनपान हे आई आणि बाळ यांच्यातील संवादाचे एक अद्वितीय आणि शक्तिशाली माध्यम आहे. माता त्यांच्या मायक्रोबायोटा आणि मायक्रोबायोमचे घटक, मानवी शरीरात राहणारे असंख्य जीवाणू तसेच त्यांचे अनुवांशिक घटक त्यांच्या मुलांना आईच्या दुधाद्वारे प्रसारित करतात व आतडे, पोट सक्षम होण्यास मदत मिळते.

हे चांगले ‘बॅक्टेरिया’ आतड्यात राहतात आणि रोगाशी लढण्यास, अन्न पचवण्यास आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यास मदत करतात. ते अनुवांशिकदृष्ट्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात. आईचे दूध हे चांगले बॅक्टेरियांना अन्न पुरवते, शेकडो जटिल शर्करेच्या साखळीच्या स्वरूपात जे फक्त मानवी दुधात आढळतात.

या शर्करा केवळ निरोगी जीवाणूंनाच आहार देत नाहीत तर ते धोकादायक जीवाणूंना वाढण्यापासून रोखतात. ही प्रक्रिया आयुष्यभर बाळाच्या आतड्याच्या मायक्रोबायोमच्या निरोगी विकासाचा आराखडा तयार करण्यास मदत करते. स्तनपानाच्या गतिमान, जैविक प्रक्रियेद्वारे, अर्भके त्यांच्या मातांना विशिष्ट क्षणी त्यांना नेमके काय हवे आहे हे सांगू शकतात.

लहान मुले स्तनपान करत असताना, त्यांच्या लाळेच्या गुणधर्मांच्या प्रतिसादात आईच्या दुधाची रोगप्रतिकारक रचना व क्षमता मिसळत जाते. अर्भकाच्या शरीरात रोगजन्य काही आढळल्यास, आईचे शरीर त्यांच्याशी लढण्यासाठी प्रतिपिंड तयार करू शकते. अशाप्रकारे आईचे दूध हे फक्त अन्न आणि एक प्रभावी औषधापेक्षा जास्त आहे, जे मुलाच्या किंवा त्याच्या आईच्या शरीराच्या गरजेनुसार तयार केले जाते.

World Breastfeeding Week
Greek culture: ग्रीकांची वैज्ञानिक परंपरा

आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, आईच्या दुधाचे घटक काही जनुकांच्या अभिव्यक्तीच्या मार्गावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात किंवा आयुष्यभर टिकणाऱ्या प्रभावांना सक्रिय करू शकतात. उदाहरणार्थ, आईचे दूध लठ्ठपणा आणि इतर जुनाट आजारांच्या अनुवांशिक प्रवृत्तीचा प्रतिकार करण्यास मदत करू शकते.

पहिले दूध, प्रतिपिंडांनी समृद्ध असते आणि नवजात बालकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. एवढेच नव्हे तर त्यांची स्वतःची रोगप्रतिकारक प्रणाली विकसित करण्यास खूप मदत करते. आईच्या दुधाची रचना प्रत्येक नवजात अर्भक-मातेच्या जोडीसाठी अद्वितीय असते. विशेषत: कोणत्याही क्षणी उद्भवलेल्या अर्भकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली जाते.

मूल दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान दिले जाऊ शकते; तथापि मुलांनी वयाच्या ६व्या महिन्यापासून घन, अर्ध-घन किंवा मऊ पदार्थ खाणे सुरू केले पाहिजे, या कालावधीत आईचे दूध हे आवश्यक चरबी, प्रथिने आणि इतर पोषक तत्त्वांचा मुख्य स्रोत आहे, विशेषत: विविध खाद्यपदार्थांच्या मर्यादित घासांसोबत.

World Breastfeeding Week
Restaurant: चवदार व देखणे फ्युजन फूडचे ठिकाण ‘पेतिस्को'

आजारपणात सतत स्तनपान करणेदेखील आवश्यक आहे; आजारी मुलांना अनेकदा अन्नाची भूक कमी असते, स्तनपान सुरू ठेवल्याने निर्जलीकरण टाळता येते आणि बरे होण्यासाठी आवश्यक पोषक घटकदेखील मिळतात. खरेच, १२-२३ महिन्यांच्या कालावधीत सततचे स्तनपान, ज्या सर्व कारणांनी मृत्यू ओढवतो, त्यांपैकी मृत्यूच्या अर्ध्याअधिक कारणांना दूर सारून मुलास जीवदान देऊ शकते.

सतत स्तनपान हे सातत्याने मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमधील बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होण्यास मदत करते. अधिक उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, स्तनपानाच्या दीर्घ कालावधीमुळे मुलाचे जास्त वजन आणि लठ्ठपणाचा धोका कमी होऊ शकतो. मातांसाठी सतत स्तनपान देणेदेखील महत्त्वाचे आहे;

त्यांच्या आयुष्यात प्रत्येक १२ महिन्यांनी स्तनपान करवल्यास, स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका ६ टक्क्यांनी कमी होतो. संशोधनात असेही समोर आले आहे की, सतत स्तनपान दिल्याने गर्भाशयाच्या संभाव्य कर्करोगापासून आणि टाइप २ मधुमेहापासून संरक्षण होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com